पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून हत्या file photo
पुणे

'वनराज आंदेकरला मारा, सोडू नका..', सख्ख्या बहिणीची घटनास्थळी हल्लेखोरांना चिथावणी

Vanraj Andekar Pune news : वनराज खून प्रकरणी सख्ख्या बहिणीसह ५ जण अटकेत

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar Pune news) यांच्या खुनाला (Vanraj Andekar Pune news) कौटुंबिक व आर्थिक वादाची किनार असल्याचा प्रकार पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आंदेकर यांची सख्खी बहीण संजीवनी कोमकर आणि मेहुणा जयंत कोमकर यांच्यासह पाच जणांना अटक केली असून, १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

त्यापैकी जयंत आणि त्याचा भाऊ गणेश कोमकर यांना न्यायालयाने ९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. हल्लेखोरांनी वनराज यांच्यावर कोयत्याने १५ वार करून पिस्तुलातून ५ गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार यानिमित्ताने समोर आला आहे. संजीवनी जयंत कोमकर, जयंत लक्ष्मण कोमकर, भाचा प्रकाश जयंत कोमकर, गणेश लक्ष्मण कोमकर (चौघे रा. नाना पेठ), सोमनाथ सयाजी गायकवाड,

अनिकेत दुधभाते (दोघे रा. आंबेगाव पठार, धनकवडी), तुषार ऊर्फ आबा कदम, सागर पवार (दोघे रा. धनकवडी), पवन करताल (रा. मंगळवार पेठ), समीर ऊर्फ सॅम काळे यांच्यासह दहा ते पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनराज आंदेकर (वय ४०) यांचे वडील सूर्यकांत ऊर्फ बंडूअण्णा राणोजी आंदेकर (वय ६८, रा. सोनाई दादा निवास, नाना पेठ) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Vanraj Andekar firing news : गोळीबाराने नव्हे, तर कोयत्यांच्या १५ वारांमुळे गेला जीव

वनराज आणि शिवम तेथून पळून जात असताना संजीवनी कोमकर आणि जयंत कोमकर हे नाना पेठेतील त्यांच्या घरातील बाल्कनीत उभे राहून हल्लेखोरांना मारा मारा, सोडू नका, जिवे ठार मारा, अशी चिथावणी देत होते. या वेळी मात्र शिवम पळून जाण्यात यशस्वी ठरला. वनराज हे खाली पडले.

या वेळी हल्लेखोरांनी वनराज यांच्या मानेवर, चेहऱ्यावर, डोक्यावर, छातीवर, हातावर तब्बल १४ ते १५ वार करून खून केला. या वेळी आरोपींच्या दहशतीमुळे नागरिकांनी तत्काळ दुकाने बंद केली. प्राथमिक वैद्यकीय माहितीमध्ये वनराज यांच्यावर पिस्तुलातून ५ गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र त्यातील एकही गोळी त्यांना लागली नाही. मात्र कोयत्याच्या १५ वारांनी त्यांचा जीव घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Vanraj Andekar : वनराजवर कोयत्याचे १५ वार अन् पिस्तुलातून ५ बार

तर संजीवनी जयंत कोमकर, जयंत लक्ष्मण कोमकर, भाचा प्रकाश जयंत कोमकर, गणेश लक्ष्मण कोमकर (चौघे रा. नाना पेठ), सोमनाथ सयाजी गायकवाड, अनिकेत दुधभाते (दोघे रा. आंबेगाव पठार, धनकवडी), तुषार उर्फ आबा कदम, सागर पवार (दोघे रा. धनकवडी), पवन करताल (रा. मंगळवार पेठ), समीर उर्फ सॅम काळे यांच्यासह दहा ते पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वनराज आंदेकर (वय ४०) यांचे वडील सूर्यकांत ऊर्फ बंडूअण्णा राणोजी अदिकर (वय ६८, रा. सोनाई दादा निवास, नाना पेठ) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीवनी कोमकर ही वनराज आंदेकर (वय ४०) यांची बहीण आहे. जयंत है मेहुणे आहेत. आरोपी कोमकर यांचा रविवारी ( १ सप्टेंबर) आकाश सुरेश परदेशी याच्याशी वाद झाला होता. याबाबत कोमकर तक्रार देण्यासाठी समर्थ पोलिस ठाण्यात आले होते. तेथे वनराज आणि त्यांचा चुलतभाऊ शिवम गेले होते.

आरोपी संजीवनी आणि तिचा पती जयंत यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात आकाशला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या वेळी वनराज आणि शिवम यांनी मध्यस्थी करून भांडणे सोडविली. वनराज तू आमच्या दुकानावर कारवाई करण्यास सांगितले आहे.

आमच्या पोटावर पाय दिला आहे. तुला आज पोरं बोलावून ठोकणार, अशी धमकी कोमकर यांनी पोलिस ठाण्याच्या आवरात दिली, असे वनराज यांचे वडील सूर्यकांत यांनी फिर्यादीत म्हटले आहे. नाना पेठेतील दुकानावर अतिक्रमण कारवाई केल्याने आरोपी कोमकर चिडले होते.

वनराज यांच्या सांगण्यावरून कारवाई करण्यात आल्याचा आरोप दोघांनी केला होता. त्यानंतर आरोपींनी कट रचून साथीदारांना नाना पेठेत बोलावून घेतले. रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास वनराज आणि त्यांचा चुलत भाऊ शिवम गप्पा मारत थांबले होते. ऑसम कलेक्शन दुकानासमोर काळ्या दुचाकीवरून तिघे जण आले. तसेच एका पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून तिघे जण आले.

सर्व जण पळून जाऊ नये यासाठी शिवम आणि वनराज यांच्या समोरच येऊन आरोपी थांबले. त्यानंतर आणखी एक दुचाकी येऊन थांबली. मध्यभागी बसलेला आरोपी हा पवन कतराल होता. त्याने कमरेला लावलेले पिस्तूल काढून शिवम याच्यावर गोळी झाडली. त्यानंतर समीर काळे यानेही फायरिंग केली. या वेळी वनराज आणि शिवम पळून जात असताना हल्लेखोरांनी वनराज यांना गाठले. हल्लेखोरांनी वनराज यांच्यावर पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने वार करून हल्लेखोर पसार झाले.

Pune news : असा उडाला टोळीयुद्धाचा भडका

टोळीयुद्धाचा भडका १९८० च्या दशकात प्रमोद माळवदकर आणि साथीदारांनी बाळू अदिकर याचा शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात खून केल्यानंतर उडाला होता. या टोळीयुद्धातून पाच जणांचे खून झाले. त्यानंतर आंदेकर टोळीने मध्यभागात दहशत निर्माण केली. शिवसेनेचे माजी शहप्रमुख रामभाऊ पारिख यांच्यावर आंदेकर टोळीने अॅसीड हल्ला केला. नाना पेठेत वर्चस्वाच्या वादातून विजय निंबाळकर याचा खून करण्यात आला होता.

नाना पेठेत झालेल्या वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणात आणखी तिघांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. याप्रकरणी सराईत गुन्हेगार सोमनाथ गायकवाड, प्रकाश कोमकर आणि वनराज यांची बहीण संजीवनी जयंत कोमकर यांनादेखील अटक करण्यात आली आहे. - संदीपसिंह गिल्ल, पोलिस उपायुक्त, परिमंडळ १

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT