मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत: अजित पवार  Pudhari
पुणे

Wagholi Accident: मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत: अजित पवार

Ajit pawar News: अजित पवार यांची अपघातस्थळाला भेट

पुढारी वृत्तसेवा

Pune Hit and Run Case: वाघोलीतील डंपरने चिरडून झालेल्या अपघातांत तीन जणाचा मृत्यू झाला, तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपयांची शासकीय मदत, तर जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनामार्फत केला जाणार आहे.

डंपरचालकास अटक केली असून, डंपर मालकाचीदेखील चौकशी केली जाणार आहे. तसेच पारधी समाजाच्या लोकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. वाघोली येथे अपघात झालेल्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली.

या वेळी त्यांनी अपघातस्थळी वास्तव्यास असलेल्या इतर नागरिकांशी संवाद साधला. अपघाताची संपूर्ण माहिती पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांच्याकडून उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतली. या वेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, यासह पोलीस निरिक्षक पंडित रेजीवाड, पारधी समाजाचे कार्यकर्ते नामदेव भोसले उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडूनदेखील माहिती घेतली. या वेळी पारधी समाजाच्या तरुणांनी अपघाताची माहिती दिली. रोजगारासाठी शहरात यावे लागते त्यामुळे आम्हाला अमरावतीमध्येच रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीदेखील बेरोजगार तरुणांनी उपमुख्यमंत्र्याकडे केली.

तर अमरावतीमध्ये शेत जमीन मिळवून देण्यासाठी शासनाने सहकार्य करावे, अशी मागणीदेखील केली. लाडकी बहीण योजेनेचे पैसै मिळतात का, असा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला त्या वेळी पैसै मिळत नसल्याचे महिलांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून या सर्वांना शासनाच्या मिळणार्‍या सर्व सुविधा मिळवून देणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT