पुणे

निवडणुकीसाठी 462 कर्मचारी; बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांची माहिती

अमृता चौगुले

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींसाठी येत्या रविवारी (दि. 15) सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान पार पडणार आहे. एकूण 66 केंद्रांवर मतदान होणार असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य काण्याचे आवाहन तहसीलदार विजय पाटील यांनी केले आहे. तालुक्यातील मोरगाव, वाघळवाडी, पणदरे, मुरुम, वाणेवाडी, गडदरवाडी, सोरटेवाडी, कुरणेवाडी, सोनकसवाडी, कार्हाटी, लोणी भापकर, मासाळवाडी, पळशी या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व सदस्य पदांसाठी रविवारी मतदान होत आहे.

तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी 36 तर 127 सदस्यपदांसाठी 291 उमेदवार रिंगणात आहेत. वाणेवाडी ग्रामपचायतीत 4, सोरटेवाडीतील 3, सोनकसवाडी, मोरगाव व गडदरवाडी येथील प्रत्येकी 1 असे एकूण 10 सदस्य पदाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे राबवण्यासाठी 462 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर सर्व सीलबंद मतपेट्या तहसील कार्यालयातील हॉलमध्ये पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. प्रशासकीय भवनातील बैठक सभागृहात मंगळवारी (दि. 20) सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी केली जाणारआहे. उमेदवारांनी आचारसंहितेचे पालन करावे, कोणत्याही प्रकारचे मतदारांना प्रलोभन दाखवू नये, मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक केंद्रावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यात यावे, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT