पुणे

पुणे : कांदा व्यापार्‍याला 46 लाखांचा गंडा

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील एका कांदा व्यापार्‍याची कर्नाटकमधील दोघांनी तब्बल 46 लाख 33 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. कांदे खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे न देता ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी, भारती विद्यापीठ पोलिसांनी सिद्धाप्पा ए. एल. एस. भंडारी व गजेंद्र सिद्धप्पा (राहणार दोघे कर्नाटक) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दत्तनगर, नर्‍हे येथील 31 वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. ही घटना मार्च 2021 नंतर घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपींची व्यवसायाच्या निमित्ताने ओळख झाली होती. त्या वेळी दोघा आरोपींनी फिर्यादी व्यावसायिकांना ते देखील कांद्याचे मोठे व्यापारी असल्याचे सांगितले. त्यानंतर व्यावसायिकाचा विश्वास संपादन करून त्यांचा काद्यांचा माल विदेशात पाठवून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. व्यावसायिकाकडून आरोपींनी वेळोवेळी कांद्याचा माल घेऊन त्याचे 46 लाख 36 हजार रुपये परत न देता फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानुसार पोलिसांनी चौकशीनंतर गुन्हा दाखल केला आहे.

SCROLL FOR NEXT