पुणे

पिंपरी : चार महिन्यांत शहरात निर्माण झाला 4,326 किलो वैद्यकीय कचरा

अमृता चौगुले

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील रूग्णालय, दवाखाना, लॅबोरेटरी, कोस्टाईन सेंटर, आयसोलोशेन सेंटर व इतर ठिकाणी निर्माण झालेला वैद्यकीय कचरा (मेडिकल वेस्ट) तसेच, कोरोनाचा कचरा जमा करून त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने पालिका विल्हेवाट लावते. शहरातून मे ते ऑगस्ट 2022 या चार महिन्यांत एकूण 4 हजार 326 किलो मेडिकल वेस्ट जमा झाल्याचा दावा महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केला आहे.

या कामासाठी पालिकेने पास्को इन्व्हारमेंटल सोल्यूशन प्रा. लि. या एजन्सीची नियुक्ती केली आहे. ती एजन्सी शहरातील पालिका, शासकीय, निन्मशासकीय व खासगी रूग्णालय, दवाखाने व लॅबोरेटरीतून मेडिकल वेस्ट जमा करून त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावते. त्यासाठी पालिका त्या एजन्सीला प्रत्येक किलोसाठी 87 रूपये शुल्क पालिका देते. मे ते ऑगस्ट 2022 या चार महिन्यांच्या कालावधीत एकूण 4 हजार 326 किलो मेडिकल वेस्ट जमा झाला. त्यासाठी पालिकेचे तीन लाख 76 हजार 368 खर्च केला आहे.

SCROLL FOR NEXT