पुणे

पिंपरी: नाना काटे यांना 40 संघटनांचा पाठिंबा

अमृता चौगुले

पिंपरी: पुढारी वृत्तसेवा: भाजपा देशात धार्मिक व जातीय राजकारण करत आहेत. महागाई, वाढलेली बेरोजगारी हे देशासमोर भीषण प्रश्न असताना भाजपा मात्र, धर्म व मंदिराच्या नावाने राजकारण करत आहे. त्यामुळे परिवर्तन घडणे ही काळाची गरज आहे. परिवर्तनाची सुरुवात चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीपासून सुरू करण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील सामाजिक व पुरोगामी चळवळीतील तब्बल 40 पक्ष व संघटनांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना आपला पाठिंबा जाहीर केला असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी शुक्रवारी (दि.17) रहाटणी येथे केले.

परिषदेस उमेदवार नाना काटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, प्रचारप्रमुख भाऊसाहेब भोईर, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, सरचिटणीस विनायक रणसुभे, काशिनाथ नखाते, डॉ. सुरेश बेरी, धनाजी येळकर पाटील, सचिन आल्हाट, सतीश काळे, गणेश दराडे, प्रकाश जाधव, अमीन शेख, अपर्णा दराडे, युवराज बाळासाहेब पवार, अशोक मिरगे, कॉ. माधव रोहम, प्रल्हाद कांबळे, अरविंद जक्का, शैलेश गाडे, लता भिसे, शिवशंकर उबाळे, विशाल कसबे, सचिन सकाटे, हरिभाऊ वाघमारे, अभिजीत भालेराव, चेतन वाघमारे, शांताराम खुडे, सचिन बगाडे, गिरीश साबळे, बाबासाहेब चव्हाण, प्रदीप पवार, राजेश माने, आशिष शिंदे, लालासाहेब गायकवाड, दिलीप काकडे, कॉ . बी.टी . देशमुख, सिद्धेश्वर, तानाजी हराळे, चंद्रकांत क्षीरसागर, अनंत व्हंडरने, नकुल भोईर, संतोष वाघे उपस्थित होते.

मानव कांबळे म्हणाले की, न्यायव्यवस्था, रिझर्व्ह बँक , निवडणूक आयोग, सीबीआय, इन्कम टॅक्स यांचा उपयोग विरोधी सरकार पाडण्यासाठी केला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनैतिक पद्धतीने आठ महिन्यापूर्वी शिंदे सरकार स्थापन केले. भाजपा व शिंदे गटाचे नेते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भाऊराव पाटील अशा महापुरुषांचा अवमानकारक वक्तव्य करतात.

धनाजी येळेकर म्हणाले की , पिंपरी-चिंचवड महापालिकेत पाच वर्षे भाजपाची सत्ता होती. या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे पुराव्यानिशी समोर आले. सत्ताधारी पक्षातील आमदार नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे सभागृहात मांडण्याचे धाडस करत नाहीत. भाजपाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात सुरू असलेल्या आमच्या लढ्याला एकाचवेळी 40 संघटनांनी पाठिंबा देणे ही अभिमानाची बाब आहे, असे नाना काटे यांनी सांगितले.

पाठिंबा दिलेल्या संघटना :
बाबा आढाव- हमाल पंचायत, मानव कांबळे- नागरी हक्क सुरक्षा समिती, काशिनाथ नखाते- कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, डॉ सुरेश बेरी- कामगार संघटना, धनाजी येळकर पाटील – छावा संघटना, सतीश काळे – संभाजी ब्रिगेड, सचिन आल्हाट- छावा संघटना, गणेश दराडे- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अमीन शेख – डीवायएफआय, अपर्णा दराडे- जनवादी संघटना, प्रकाश जाधव – मराठा सेवा संघ उद्योग आघाडी, युवराज बाळासाहेब पवार- पिंपरी चिंचवड कामगार संघटना, अशोक मिरगे, आत्माराम नाणेकर – रिक्षा पंचायत पुणे, पिंपरी चिंचवड, माधव रोहम- ग्रीव्हज कॉटन युनियन, प्रल्हाद कांबळे- हॉकर्स महासंघ, अरविंद जक्का- आयटक संघटना, शैलेश गोडे – पथारी व्यवसाय पंचायत, लता भिसे- महिला संघटना आयटक, शिवशंकर उबाळे- भीमशाही युवा संघटना, निवृत्ती आरु-पँथर्स रिपब्लिकन पार्टी, विशाल कसबे- मातंग एकता आंदोलन संघटना, सचिन सकाटे- दलित महासंघ, हरिभाऊ वाघमारे- झोपडपट्टी सुरक्षा दल, अभिजीत भालेराव- स्वाभिमानी विकास मंच संघटना, चेतन वाघमारे- सावता परिषद संघटना, शांताराम खुडे- भ्रष्टाचार निर्मूलन समिती, सचिन बगाडे- सत्यशोधक बहुजन आघाडी, गिरीश साबळे- महामानव एक्सप्रेस रिक्षा संघटना,बाबासाहेब चव्हाण- एकता रिक्षा महासंघ, प्रदिप पवार- स्वराज अभियान महाराष्ट्र, राजेश माने- बांधकाम कामगार संघ, आशिष शिंदे-कामगार नेते, लालासाहेब गायकवाड- अखिल भारतीय निर्मुलन समिती, दिलीप काकड- नागरी हक्क सुरक्षा समिती, डॉ. कॉ. बी. टी. देशमुख- सीपीआयएम, सिद्धेश्वर कोटुळे, तानाजी हराळे- बाबा आढाव संघटना, चंद्रकांत खंडू क्षीरसागर – बाबा आढाव संघटना, नकुल आनंदा भोईर- वीर भगत सिंग विद्यार्थी परिषद, संतोष वाघे-छावा मराठा संघटना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT