पिंपरी : महापालिकेत अनेक अधिकारी व कर्मचारी दर महिन्यास निवृत्त होत आहेत. तसेच, महापालिकेचा नव्या आकृतीबंधात असंख्य नवे पदे निर्माण झाली आहेत. या सर्व बाबींचा विचार केल्यास पालिकेत सध्या विविध विभागांतील तब्बल 4 हजार 368 पदे रिक्त आहेत.
शहरात वाढते नागरीकरण आणि त्या नागरिकरणाला दैनंदिन सुविधा पुरविताना महापालिका प्रशासनावर प्रचंड ताण येत आहे. तब्बल 4 हजार 368 इतकी पदे भरण्याची अत्यावश्यकता आहे. उपलब्ध अधिकारी, कर्मचारी तसेच, मानधन व कंत्राटी मनुष्यबळाद्वारे कामे करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
यामध्ये महापालिकेचे अ, ब, क आणि ड या श्रेणीत एकूण 356 संवर्ग आहेत. यात मंजूर पदांची संख्या 11 हजार 513 इतकी आहे. त्यापैकी 7 हजार 124 इतकी पदे भरली आहेत. तर 4 हजार 368 इतकी पदे रिक्त आहेत. अ श्रेणीत 281 पदे मंजूर असून, त्यापैकी 165 पदे भरलेली आहेत. तर, 116 पदे रिक्त आहेत.
महापालिकेतर्फे नागरिकांसाठी व्हॉट्सअॅप, वेब चॅटबॉट सेवा
महापालिका आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वतीने व्हॉट्सअॅप आणि वेब चॅटबॉट प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यावर नागरिकांना विविध विभागासंदर्भातील तक्रारी करता येणार आहेत. त्या सुविधा प्रणालीची सुरुवात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते नुकतीच करण्यात आली.
चॅटबॉट प्रणालीमध्ये 23 विभागांचा समावेश
मिळकतकर, पाणीपुरवठा, बांधकाम परवानगी, समाज विकास, नगररचना आदी विविध 23 विभागांचा समावेश चॅटबॉट प्रणालीमध्ये करण्यात आला आहे. चॅटबॉट ही एक संगणक प्रणाली असून, त्या माध्यमातून नागरिकांच्या लिखित व बोललेल्या संवादाचे विश्लेषण करण्यात येते. नागरिकांना प्रत्यक्ष मनुष्याशी संवाद साधल्यानंतर ज्या पद्धतीने उत्तर मिळते, त्याच पद्धतीने सदर संगणक प्रणालीद्वारे उत्तर मिळते. चॅटबॉट विंडो पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
असा घ्या सुविधेचा लाभ
वेब चॅटबॉट सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी प्रथम महापालिकेच्या लिालळपवळर.र्सेीं.ळप संकेतस्थळावर जाऊन क्लिक करावे. त्यानंतर, चॅटबॉट लोगोवर क्लिक करून भाषा निवडावी. 'विभागाशी संबंधित प्रश्न' या टॅबवर क्लिक करून ज्या विभागाशी संबंधित माहिती हवी आहे, तो विभाग निवडावे. तसेच व्हॉटसअॅप चॅट सुविधेचा लाभ घेण्यासाठी सारथी मोबाईल क्रमांक (8888006666) आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून मेन बटनवर क्लिक करावे.