पुणे

पुणे : खानवटे येथे 3500 किलो मांगूर मासा केला नष्ट

अमृता चौगुले

भिगवण : पुढारी वृत्तसेवा : पुणे मत्स्यव्यवसाय विभागाने शुक्रवारी (दि.10) खानवटे (ता.दौंड) येथे बेकायदेशीर मांगुर संवर्धकावर धडक कारवाई करीत 3500 किलो मांगुर नष्ट केला. सततच्या कारवाईमुळे मुजोर बनलेले मांगुर संवर्धक कमालीचे हादरले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कर्जत पोलिसांनीही खेड भागात कारवाई केली आहे.

आरोग्याला अपायकारक असलेल्या मांगुर जातीच्या माशांचे संवर्धन करण्यास संपूर्ण भारतात बंदी आहे असे असताना पुणे जिल्ह्यात बर्‍याच भागात या माशांची बेकायदेशीर शेती केली जात आहे. इंदापूर व दौंड तालुक्यांतही मोठ्या प्रमाणात याचे संवर्धन केले जात आहे. याबाबत काही नागरिकांनी मत्स्यव्यवसाय विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. यावरून गुरुवारी कालठण (ता.इंदापूर) येथे कारवाई होताच दुसर्‍या दिवशी खानवटे येथे पुणे मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त अविनाश नाखवा, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी दीपाली गुंड यांनी कारवाई करीत अंदाजे तीन लाख रुपये किंमतीचा 3500 किलो मांगुर नष्ट केला.

SCROLL FOR NEXT