पुणे : पुणे विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सध्या विमानतळावरून दिवसाला 30 हजारांपेक्षा अधिक पुणेकर विमानाने प्रवास करतात. तसेच दिवसाला 180 ते 186 विमानांची उड्डाणे होत आहेत.
5 फेब्रुवारीचा प्रवासी वाहतूक तपशील-
आगमन – 94 विमानामध्ये 15077 प्रवासी
निर्गमन – 94 विमानांमध्ये 15017 प्रवासी
एकूण – 186 विमानांमध्ये 30 हजार 94 प्रवासी
5फेब्रुवारीचा प्रवासी वाहतूक तपशील-
आगमन – 91 विमानामध्ये 14995 प्रवासी
निर्गमन – 91 विमानांमध्ये 14311 प्रवासी
एकूण – 182 विमानांमध्ये 29 हजार 306 प्रवासी
नवीन टर्मिनल तातडीने खुले करा
जुन्या पुणे विमानतळाशेजारीच नवे टर्मिनलचे काम सुरू आहे. ते काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित काम तातडीने पूर्ण करून विमानतळ प्रशासनाने नवे टर्मिनल प्रवासी वाहतुकीसाठी खुले करावे, अशी मागणी होत आहे.
प्रवाशांच्या मागणीनुसार पुणे विमानतळ प्रशासनाने कर्नाटक येथील हुबळी येथे प्रवाशांना जाण्यासाठी दोन नवीन उड्डाणे सुरू केली आहेत. ही उड्डाणे आठवड्यातून दोन दिवस म्हणजे शनिवार आणि रविवारी पुण्यातून होती. ही सेवा इंडिगो एअरलाईन्सद्वारे देण्यात येणार आहे.
पुणे विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असून, प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, याकरिता नियोजन करण्यात येत आहे. यात प्रवासी जास्त वेळ रांगेत उभे राहू नयेत, म्हणून आम्ही सिक्युरिटी काऊंटर वाढविले आहेत. तसेच, सीआयएसएफ जवानांची संख्याही वाढविली आहे.
– संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ