पुणे

Pimpari : सॉफ्टेवअर इंजिनिअरला 28 लाख 35 हजारांचा गंडा

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : विविध कंपन्यांचे 'आयपीओ' खरेदीच्या आमिषातून सॉफ्टवेअर इंजिनिअरला गंडा घातला. ऑनलाइन पद्धतीने 28 लाख 35 हजारांची फसवणूक केली. विविध बँकांच्या खातेधारकांसह महिलांवरही गुन्हा दाखल केला. वाकड येथील कस्पटे वस्तीत 15 नोव्हेंबर 2023 ते 23 जानेवारी 2024 या कालावधीत ही घटना घडली. मयूर उमेश चुटे (32, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी मंगळवारी (दि. 23) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अर्पण चॅटर्जी, संशयित महिला, मोबाइल धारक, आयसीआयसीआय बँक, पंजाब नॅशनल बँक, फेडरल बँक, आयडीएफसी बँक, इंडसंट बँक व इतर बँकेचे खातेधारक यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयूर चुटे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांच्या फेसबुकरवर एआरके इनव्हेस्ट नावाचा ग्रुप दिसला असता त्यांनी ग्रुपच्या लिंकवर क्लिके केले.

त्या वेळी संशयित महिलेने त्यांना एआरके इनव्हेस्ट नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर मयूर यांच्या वडिलांनी मयूर यांना संशयित महिलेचा व्हॉट्सअप मोबाइल क्रमांक दिला. त्यावर मयूर यांनी संपर्क केला असता त्यांनी शेअर मार्केटबद्दल माहिती दिली. त्यानंतर 15 नोव्हेंबर 2023 रोजी मयूर यांना पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी त्यांच्या कस्टमर सर्व्हिसचा क्रमांक दिला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड तपास करीत आहेत.फफ

पेनल्टीच्या नावाखाली भरावयास लावले पैसे
मयूर यांना विविध कंपन्यांचे आयपीओ खरेदी करण्याचे आमिष दाखवून त्यासाठी विविध बँकांच्या विविध खात्यांवर वेळोवेळी पैसे भरावयास सांगितले. तसेच तीन टप्प्यात पैसे विड्रॉल करण्यास सांगितले. त्यानुसार, मयूर हे पैसे विड्रॉल करत असताना सिस्टम एररचे कारण सांगून तसेच पैसे विड्रॉल करत असताना मयूर यांनी काही चुका केल्याचे संशयित अर्पण चॅटर्जी याने फोनवरून सांगितले. तसेच पेनल्टीच्या नावाखाली पैसे भरावयास लावून मयूर यांना एकूण 28 लाख 35 हजार 663 रुपये भरण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर पैसे परत न करता विश्वासघात करून रकमेचा अपहार करून फिर्यादी मयूर यांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT