पुणे

आंबेगाव तालुक्यातील वळती-नागापूर बंधार्‍याचे 27 ढापे पळविले

अमृता चौगुले

पारगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात नदीपात्रातील केबल वायर, फ्यूज, स्टार्टर बॉक्स, ढापे चोर्‍यांचे सत्र सुरूच आहे. वळती ते नागापूरदरम्यान मीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यांचे 27 ढापे चोरीला गेल्याची घटना शनिवारी (दि. 13) सकाळी उघडकीस आली. याच बंधार्‍याच्या ढाप्यांची चोरी होण्याची ही तिसरी वेळ आहे.

वळती ते नागापूरदरम्यान मीना नदीवर मोठा बंधारा आहे. बंधार्‍यातील पाण्याचा वळती, नागापूर गावांबरोबरच परिसराला मोठा फायदा आहे. सदर बंधारा हा वस्तीपासून दूर असल्याने त्यास चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. याआधीही दोन वेळा या बंधार्‍याचे ढापे चोरट्यांनी चोरून नेले. त्यानंतर बंधार्‍याच्या एका बाजूचे संरक्षक कठड्यांचे लोखंडी पाइप पळविण्यात आले. आता पुन्हा बंधार्‍यातील 20 ढापे चोरट्यांनी लांबविले. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

जलसंपदा विभागाने मीना नदीत पाण्याचे आवर्तन सोडले आहे. शनिवारी सकाळी जलसंपदा विभागाचे कालवा निरीक्षक एकनाथ खरमाळे बंधार्‍यातील पाणीपातळी पाहण्यासाठी गेले असता बंधार्‍यातील नागापूर गावच्या बाजूला बसविलेले सात गाळ्यांमधील ढापे चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरीची घटना ऐन उन्हाळ्याच्या दिवसात घडल्याने बंधार्‍यात पाणी साठणार नाही. त्याचा परिणाम उन्हाळी पिकांना बसणार आहे. जलसंपदा विभागाने लवकरात लवकर नवीन ढापे बसवावेत, अशी मागणी स्थानिक शेतकर्‍यांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT