आळंदीत इंद्रायणी नदी पात्रात पुन्हा एका महिलेने उडी मारत जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. Pudhari News Network
पुणे

आळंदी येथे इंद्रायणी नदीत २५ वर्षीय महिलेची उडी; पोलिसांकडून शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : आळंदीत इंद्रायणी नदी पात्रात पुन्हा एका महिलेने उडी मारत जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज (दि.२९) सकाळी ८ च्या सुमारास घडली. तिचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिली.

चार दिवसांपूर्वीच महिला पोलीस कॉन्स्टेबलने जीवन संपविले.

चार दिवसांपूर्वीच पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या अनुष्का केदार यांनी आळंदीतील नव्या पुलानजीक असलेल्या गरुड खांबावरून इंद्रायणीत उडी मारत जीवन संपविले होते. पुढे दहा किलोमीटरवर गोलेगाव या ठिकाणी त्यांचा मृतदेह चार दिवसानंतर मिळून आला होता. ही घटना ताजी असतानाच आज सकाळी आठच्या सुमारास एका पंचवीस वर्षे महिलेने इंद्रायणीवरील राम घाट, भक्ती - सोपानपुलानजीक उभारण्यात आलेल्या उंच स्काय वॉक पुलावरून इंद्रायणीत उडी मारली. पाणी वाहते असल्याने त्या दूरवर वाहत गेल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले.

या महिलेचे वय अंदाजे २५ वर्षे असून तिचे नाव व ओळख अद्याप समजलेली नाही. आळंदी पोलीस या महिलेचा नदीत शोध घेत असून आळंदी नगरपरिषद, अग्निशमन दल शोध मोहिमेत सामील झालेले आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT