पुणे

पुणे : मेट्रो फीडर सेवेसाठी पीएमपीच्या 24 फेर्‍या

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पीएमपी प्रशासनाकडून मेट्रोच्या फीडर सेवेकरिता दिवसाला 24 बसफेर्‍यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मेट्रो प्रवाशांना मेट्रोतून उतरल्यावर लगेचच पीएमपीच्या बसची फीडरसेवा उपलब्ध होणार आहे. याचे नियोजन मेट्रो अधिकार्‍यांशी चर्चा झाल्यानंतर पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी केले आहे.

या मार्गावर वर्तुळाकार फीडरचे नियोजन
पुणे परिसर ः वनाज मेट्रो स्टेशन – 5, आनंदनगर मेट्रो स्टेशन – 1, नळस्टॉप मेट्रो स्टेशन – 4, गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन – 1, संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन – 1
पिंपरी-चिंचवड परिसर ः
पिंपरी मनपा स्टेशन – 5, संत तुकारामनगर मेट्रो स्टेशन – 1, नाशिक फाटा (भोसरी) – 3, दापोडी – 1, बोपोडी – 1, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन
(भुयारी) – 1

SCROLL FOR NEXT