भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यातील 19 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी खेडचे तहसीलदार प्रशांत बेडशे व अपर तहसीलदार स्नेहा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.6) राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलात झाली. मतमोजणीवेळी राजगुरूनगर ठाण्याच्या पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. निकालानंतर विजयी उमेदवार आणि त्यांचे समर्थक, कार्यकर्त्यांनी गुलाल भंडाराची मुक्तपणे उधळण केली. निवडणूक झालेल्या 19 आणि बिनविरोध झालेल्या 6 अशा एकूण खेडच्या 25 ग्रामपंचायतींपैकी 23 ग्रामपंचायती अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारली, तर दोन ग्रामपंचायती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेल्या आहेत.
तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपा, ठाकरे गट,शरद पवार गट,काँग्रेस यांना एकही ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविता आले नाही. खेड तालुक्यातील एकूण 25 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका लागल्या असता 6 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 19 ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि.5) मतदान झाले. सोमवारी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले.आमदार दिलीप मोहिते यांचे गाव असलेल्या शेलपिंपळगाव ग्रामपंचायतीत त्यांची सत्ता आली.
खेडच्या 19 ग्रामपंचायतींत लोकनियुक्त सरपंच व सदस्यपदाच्या निवडणुकीत निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे –
सातकरस्थळ – सरपंच – ऋतिका आकाश सातकर, सदस्य – प्रमोद शंकर सुपे, नीलेश सुदाम अरबूज, स्वाती अभिजित सातकर, मयूर विठ्ठल जगदाळे (बिनविरोध),नयना प्रवीण काळे,अमिता राजेश सातकर, अजय जयराम चव्हाण,जयश्री संतोष पडवळ,वर्षा किरण देवरे.
सांडभोरवाडी – सरपंच – प्रतीक्षा संतोष पाचारणे, सदस्य – प्रियंका स्वप्नील ढोरे,भगवान रामदास पाचरणे,प्रियांका महेंद्र पाचरणे,रंगनाथ भिकाजी आरुडे,ज्ञानेश्वर किसन आरुडे,
कविता संतोष आरुडे, विठ्ठल किसन वरकड,ज्योती राहुल सांडभोर (बिनविरोध), बाळू
सोपान सांडभोर, सीमा नीलेश पठारे,कविता
सचिन सांडभोर.
वाळद – सरपंच – मनोहर बबन पोखरकर, सदस्य – विक्रम दादाभाऊ पोखरकर,धनिका संतोष पोखरकर,मनीषा बाळासाहेब सावंत, शकुंतला शंकर तळपे,दिनेश बबन लांडगे, नितीन सदाशिव वाळुंज,मीराबाई चंद्रकांत पोखरकर.
कोहिनकरवाडी – सरपंच – पंढरीनाथ गणपत कोहिनकर, सदस्य – स्वप्निल दत्तात्रय कोहिनकर,मोनिका निखिल कोहिनकर,भाग्यश्री सुधीर कोहिनकर,सोमनाथ पांडुरंग कोहिनकर,प्रियंका दत्तात्रेय मुळे,गणेश नंदकुमार मुळे,काजल सोमनाथ करमारे.
कोळीये – सरपंच – साधना दत्ता कवडे, सदस्य – संतोष ममतू कवडे. अन्य सहा जागा बिनविरोध.
निघोजे – सरपंच – सुनीता कैलास येळवंडे. तेरा जागा बिनविरोध.
पिंपळगाव तर्फे खेड – सरपंच – शरद मल्हारी मोहिते,सदस्य – बायडाबाई नवनाथ दौंडकर, अभिषेक उत्तम दौंडकर, बाळकृष्ण हनुमंत
दौंडकर,सुधीर संतोष गायकवाड,विशाल पांडुरंग पोतले,प्रिया नितीन मोहिते, गणेश शिवाजी मोहिते, आरती संदीप पोतले,नीलम राहुल पोतले. अन्य चार जागा बिनविरोध.
डेहणे – सरपंच – मीना एकनाथ लांघी, सदस्य – शंकर हरिश्चंद्र कोरडे. सहा जागा बिनविरोध.
मोरोशी – सरपंच – युवराज रघुनाथ सोरकडे. सदस्य बिनविरोध.
भोमाळे – सरपंच – प्रियंका अरुण आढारी, सदस्य – सुधीर मधुकर भोमाळे, गणेश सुरेश जफरे,अनिता जयराम सावंत, चार जागा बिनविरोध.
वरुडे – सरपंच – सुनीता संभाजी पडवळ, सदस्य – निशा तुकाराम तांबे, अनुजा नीलेश तांबे,चैत्राली सतीश तांबे, सहा जागा बिनविरोध.
देशमुखवाडी – सरपंच – दत्तात्रय अनिल देशमुख, सदस्य – बापू धर्मा देशमुख, अक्षरा नंदू देशमुख, राणी प्रकाश देशमुख, रवींद्र भरत देशमुख, सुंदर शंकर भोईर, विकास सुरेश भेगडे,सविता माणिक देशमुख.
सुपे – सरपंच – सुमित्रा सचिन चांभारे, सदस्य – अरुण महादू पिसाळ,सविता संजय खेडेकर, नंदा संभाजी पिसाळ, कांता नामदेव बुढे, संजय सीताराम डांगले, दिनेश नफाजी बुढे, नकुशा सुरेश घुले.
एकलहरे – सरपंच – मीरा राणू आंबेकर. सात जागा बिनविरोध.
गोरेगाव – सरपंच – आरती विलास भागीत, सदस्य – विठ्ठल कृष्णा गवारी, वंदना धोंडू लाडके, प्रकाश भीमाजी गवारी, स्वाती गणेश गवारी, अंकुश गोपाळा गवारी, सुनंदा दत्तात्रय तळपे, मंदा नारायण गवारी.
धुवोली ग्रामपंचायत
वॉर्ड क्र – 1 मधून पवन रामदास थोरात विजयी झाले, तर सरपंचासह अन्य सहा जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या आहेत.
आडगाव – सुनील तुकाराम गावडे, फुलाबाई दशरथ साबळे विजयी. सरपंचासह अन्य पाच जागा बिनविरोध.
उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले आहे. गावागावात केलेल्या विकासाला नागरिकांनी साथ दिली. त्यामुळेच ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळाले. भविष्यात आपण विकासाला निधी कमी पडू देणार नाही.
– दिलीप मोहिते, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस.