पुणे

200 बालकलाकार सादर करणार महानाट्य

Laxman Dhenge

तळेगाव दाभाडे : येथील कांतीलाल शाह विद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शाळेतील सुमारे 200 विद्यार्थी कलाकारांच्या सहभागातून 'जाणता राजा महानाट्य' सादर करण्याचे प्रयोजन केले आहे. येत्या 28 तारखेस होणा-या स्नेहसंमेलनासाठी या नाट्यप्रयोगाची रंगीत तालिम आज यशस्वी झाली असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका अनन्या कुलकर्णी आणि व्यवस्थापिका अर्चना चव्हाण यांनी दिली.

इंद्रायणी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणा-या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते कृष्णराव भेगडे, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, उपाध्यक्ष डॉ. दीपक शहा व गोरखभाऊ काळोखे, कार्यवाह चंद्रकांत शेटे आणि खजिनदार शैलेश शाह यांच्यासह सर्व विश्वस्त सदस्य उपस्थित राहणार आहेत.

नाट्य दिग्दर्शक म्हणून मंदार खाडे आणि नाट्यप्रेमी शिक्षकांनी शाळेतील बालकलाकारांचा गेल्या दोन महिन्यांपासून सराव करून घेतला. अभिनयाशी सुसंगत असलेल्या अनेक भूमिकांशी त्यांची प्रथमच ओळख झाल्याने या मुलांमधील कलेला वावा मिळणार असल्याचे शैलेश शाह यांनी सांगितले. हा प्रयोग सर्वांसाठी खुला असून त्याचा अनुभव घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

SCROLL FOR NEXT