पुणे

पुणे : ट्रेडिंगच्या बहाण्याने 20 लाखांची फसवणूक

अमृता चौगुले

पुणे : ट्रेडिंगसाठी गुंतवणूक केलेल्या पैशावर चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीला सायबर चोरट्यांनी 20 लाख 52 हजार 826 रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी, पोरवाल रोड, धानोरी येथील 49 वर्षीय व्यक्तीने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार सायबर चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार 7 ते 16 मार्च या कालावधीत घडला आहे. आरोपींनी फिर्यादींना मोबाईलद्वारे संपर्क केला. त्यांचा विश्वास संपादन करून ट्रेडिंगच्या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर फिर्यादींना रजिस्ट्रेशन चार्जेस म्हणून 250 डॉलर भरण्यास सांगून पेमेंटसाठी स्कॅनर पाठवून पेमेंट केलेला स्क्रिनशॉट मेल करण्यास सांगितले. तसेच वेळोवेळी त्यांच्याकडून पैसे घेतले. दरम्यान, त्यानंतरदेखील त्यांना परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली होती.

SCROLL FOR NEXT