पुणे: रेल्वेच्या पुणे विभागाकडून उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत 18 उन्हाळी विशेष गाड्या सोडल्या आहेत. या गाड्या पुढील अडीच ते तीन महिन्यांच्या कालावधीत धावणार असून, त्यांच्या एकूण 576 फेर्या होणार आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर होणार पर्यटन आणि नागरिकांचे मूळ गावी जाणे लक्षात घेऊन रेल्वेने या अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या सोडल्या आहेत.
गर्दी नियंत्रणासाठी ‘स्वतंत्र कक्ष’...!
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वे स्थानकावर होणार्या गर्दीच्या नियंत्रणासाठी पुणे रेल्वे स्थानकावर ‘स्वतंत्र कक्ष’ स्थापन करण्यात येणार आहे. हा कक्ष व्हीआयपी एन्ट्रीजवळ पार्सल विभागाशेजारी उभारला जाणार आहे. त्या कक्षात प्रवाशांसाठी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या ठिकाणी धावणार विशेष गाड्या
मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून पुणे-दानापूर, पुणे-गाझीपेठ सिटी, कोल्हापूर-कटियार, दौंड-सोलापूर-कोल्हापूर, पुणे- हरंगुळ आणि पुणे-नागपूर दरम्यान उन्हाळी विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.