पुणे

पिंपरी : वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली 17 लाखांची फसवणूक

अमृता चौगुले

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली एकाची 17 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 30 मार्च ते 13 एप्रिल या कालावधीत मुळशी तालुक्यातील भटेवरानगर येथे घडला. साधन रुद्रप्रताप मिश्रा (36, रा. भटेवरानगर, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्लीज सर्विस कंपनीचा एचआर मॅनेजर आणि विविध बँक खातेधारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[web_stories title="true" excerpt="true" author="false" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_date" view="list" /]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने फोन केला. वर्क फ्रॉम होमसाठी संधी असल्याचे फिर्यादी यांना सांगण्यात आले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या मोबाईलवर वेगवेगळे टास्क पाठवले. बँक खात्यांचे नंबर पाठवून काम देण्याच्या बहाण्याने पैसे मागितले. त्यानुसार, फिर्यादी यांनी वेळोवेळी 17 लाख 25 हजार रुपये दिले. पैसे दिल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना कुठल्याही प्रकारचे काम अथवा पैसे परत न करता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT