बारामती : पुढारी वृत्तसेवा : एसटीतून महिलांना निम्म्या तिकीटदरात प्रवासाच्या योजनेमुळे एसटीचा पुणे विभाग मालामाल होत आहे. एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ होण्यासोबतच उत्पन्नातही वाढ होत असल्याने हा निर्णय एसटीसाठी दिलासादायक ठरला आहे.
महिला सन्मान योजनेचा महिनाभरात पुणे विभागातील बसमधून 17 लाख 14 हजार महिलांनी लाभ घेतला आहे. महामंडळाने 17 मार्च 2023 पासून महिला सन्मान योजना कार्यान्वित केली. जिल्ह्यात 16 एप्रिलपर्यंत 17 लाख 14 हजार महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे.
आगारनिहाय लाभार्थी :
शिवाजीनगर आगार : 1 लाख 16 हजार, स्वारगेट : 1 लाख 7 हजार, भोर 1 लाख 55 हजार, नारायणगाव 2 लाख 89 हजार, राजगुरुनगर 2 लाख 28 हजार, तळेगाव 75 हजार, शिरूर 1 लाख 18 हजार, बारामती 2 लाख 28 हजार, इंदापूर 1 लाख 71 हजार, सासवड 90 हजार, दौंड 63 हजार, पिंपरी-चिंचवड 51 हजार, एमआयडीसी 82 हजार असे एकूण जिल्ह्यात 17 लाख 14 हजार महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे. यातून एसटी महामंडळाला 6 कोटी 42 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी सांगितले.