पुणे

पुणे : सराईत चोरट्याकडून 17 दुचाकी जप्त ; चोरलेल्या दुचाकी विकल्या उस्मानाबादेत

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  विश्रामबाग पोलिसांनी सराईत चोरट्याला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या अडीच लाख रुपये किमतीच्या तब्बल 17 दुचाकी जप्त केल्या आहेत. विकास उद्धव माने (वय 34, रा. टिळेकरनगर, कात्रज, मूळ रा. उमरगा, उस्मानाबाद) असे चोरट्याचे नाव आहे. चोरी केलेल्या दुचाकींची येईल तेवढ्या किमतीत तो उस्मानाबाद जिल्ह्यात विक्री करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. गेल्या काही दिवसांमध्लध्ये वाहनचोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता, विश्रामबाग पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.

दरम्यान दुचाकी चोरट्यांचा शोध घेत असतानास पोलिस हवालदार हर्षल दुडम व आण्णा बोरूटे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, एक दुचाकी चोरटा पेरुगेट पोलिस चौकीच्या परिसरात येत आहे. त्यानुसार दहा ते पंधरा दिवस विकास याच्यावर पळत ठेवून त्याला टिळक स्मारक मंदिराच्या समोरील गल्लीतून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने सांगितले की, तो रात्री व दिवसा दुचाकी गाड्यांची चोरी करत होता. गाड्यांचे लॉक न तोडता बनावट चावीच्या साह्याने तो गाड्या पळवून नेत होता. त्यानंतर पुण्यातून चोरी केलेल्या गाड्यांची तो गावी विक्री करत होता.

ही कामगिरी पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील माने, गुन्हे निरीक्षक दादा गायकवाड, उपनिरीक्षक राकेश सरडे, आशिष खरात, सत्तापा पाटील, अशोक माने, सागर गोंजारी यांच्या पथकाने केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT