राज्यात महिला अत्याचाराची दररोज 150 प्रकरणे File Photo
पुणे

राज्यात महिला अत्याचाराची दररोज 150 प्रकरणे

महिलांच्या शोषणाचा विळखा दिवसेंदिवस अधिक होतोय घट्ट

पुढारी वृत्तसेवा

शंकर कवडे

पुणे : पुरुषप्रधान मानसिकतेमुळे महिलांविरोधी घडणार्‍या गुन्ह्यांबद्दल आणि क्रूरतेबद्दल जनतेची संवेदना वाढत असली तरी गुन्ह्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार राज्यात महिलांविरोधातील अत्याचाराची दररोज 130 ते 150 प्रकरणे नोंदविली जात असून 2023 मध्ये 47 हजार 381 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहेत.

आधुनिक म्हणविणार्‍ीया समाजात शारिरीक, मानसिक, आर्थिक शोषणापासून सायबर पोर्नोग्राफी द्वारे बदनामी सारख्या घटना घडत आहेत. कुटुंबसंस्थेचा विकास होत असताना महिलांचे कार्यक्षेत्र मात्र संकुचित होत गेल्याचे चित्र आहे. कुटुंबाच्या जबाबदार्या स्वीकारतांना समाजातले मूल्यही हरवत गेल्याने अनेक रूढी, परंपरेच्या नावाखाली स्त्री हा घटक आजही बळी ठरत आहे. शहरासह ग्रामीण भागात होणार्‍या महिलांविरोधातील गुन्ह्यांवरून दिसून येते.

सायबर गुन्ह्यांद्वारेही महिलांचे शोषण

  • ई हॅरॅसमेंट : बदनामी करण्यासाठी मोबाईल एस.एम.एस, सोशल साईट किंवा इंटरनेटच्या माध्यमातून मजकूर प्रसिद्ध.

  • फिशिंग : लॉटरी लागली, योजनेसाठी निवड झाली असे आमिष दाखवून पैसे भरण्यास सांगणे.

  • सायबर स्टॉकिंग (पाठलाग) : दिवसभराच्या दिनचर्येवर लक्ष ठेवून ई-मेल, एस.एम.एसच्या माध्यमातून बदनामी तसेच अश्लील मेसेज.

  • सायबर पोर्नोग्राफी : फोटोची मोडतोड करत अश्लील छायाचित्रांची क्लीप तयार करणे, अश्लील चित्रावर फोटो लावून सोशल साईटच्या माध्यमातून बदनामी.

  • ई-मेल स्फुफिंग : मॅसेजच्या माध्यामतून दोघांमध्ये वितुष्ट निर्माण करत महिलेच्या प्रियजनांच्या मोबाईलवर अथवा ई-मेल वर मोडतोड करून मेसेज पाठविणे.

  • मॉर्फिंग ऑफ क्रिमिनल : अश्लील प्रोफाईल तयार करून त्रास देण्यात येतो.

राज्यात महिलांसंबंधी दाखल गुन्हे

वर्ष गुन्हे

2020 31 हजार 954

2021 39 हजार 526

2022 45 हजार 331

2023 47 हजार 381

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT