कर्हा-निरा या नदी जोड प्रकल्पातून बारामती तालुक्यातील जिरायती भागातील 14 गावे वगळण्यात आल्याने या भागातील जनतेचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. वीर धरणातून वाहून जाणारे कोट्यावधी लिटर पाणी उचलून कर्हा नदीत टाकण्याची ही योजना नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
यासाठी दोन टीएमसी पाणी उचलून कर्हा नदी टाकण्यात येणार आहे. या साठी एक हजार कोटी रुपये खर्च लागणार आहे. या योजनेतून सुमारे 33 गावातील 45 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे .
बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील मूर्टी, मोराळवाडी, कानडवाडी, मोडवे, जोगवडी, मोरगाव, आंबी, तरडोली, मासाळवाडी, पळशी, लोणी भापकर, जळगाव कप, माळवाडी, सायंबाचीवाडी ही गावे कर्हा खोर्यात असून ही या योजनेतून वगळण्यात आली आहेत.
सध्या पुरंदर उपसा सिंचन
योजनेतून बारामती बारामती तालुक्यातील 6 हजार हेक्टर भाग ओलित क्षेत्रात येते तरी ही दोन हजार हेक्टर भाग वंचित आहे. पुरंदर उपसा योजना बेभरोसे झाली असून, योजनेचा बोजवारा उडाला आहे. सध्या बारामती तालुक्यातील दोन हजार हेक्टर क्षेत्र पण या योजनेतून भिजत नाही.
जिरायती भागाला 57 वर्षानंतरही वंचित ठेवण्याची परंपरा चालू असल्याची भावना शेतकर्यांमध्ये निर्माण झाली आहे. ही योजना निवडणुकीपूर्ती गाजर आहे का? अशी साशंकता निर्माण झाली आहे, असे तरडोली येथील राजवर्धन भापकर यांनी सांगितले.