पुणे; पुढारी वृत्तसेवा : इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून एका तरुणीला गिफ्ट पाठवायची बतावणी करून तब्बल 14 लाख रुपये उकळण्यात आले आहेत. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात अनोळखी खातेधारकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत 42 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. तक्रारदार तरुणीला इन्स्टाग्रामवर स्विडनमधील व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती, ती त्यांनी स्वीकारली. त्यानंतर त्यांच्यात ओळख झाली व त्यांच्यात व्हॉट्सअॅपद्वारे चॅटिंग सुरू झाले.
या व्यक्तीने तरुणीला गिफ्ट पाठवायचे असल्याचे सांगत त्यांच्या ऑफिसचा पत्ता घेतला. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना गिफ्टचे डिलीव्हरी चार्जेस म्हणून प्रथम 72 हजार रुपये घेतले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी एकूण 14 लाख रुपये उकळले. परंतु, त्यांना गिफ्ट पाठविले नाही. त्या वेळी त्यांना फसवणूक झाल्याचा संशय आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.