18 मेअखेर ती 40 मि.मी. म्हणजे तब्बल 134 टक्के पाऊस Pudhari File Photo
पुणे

Rain update: उन्हाळी हंगामात राज्यात 134 टक्के पाऊस

Rain in Summer Update: 18 मेअखेर ती 40 मि.मी. म्हणजे तब्बल 134 टक्के पाऊस जास्त झाला

पुढारी वृत्तसेवा
  • सरासरी 17 मि.मी; मात्र प्रत्यक्षात पडला 40 मि.मी.

  • 36 पैकी 19 जिल्ह्यांत अतिवृष्टी

  • 1 मार्च ते 30 एप्रिल : 61 दिवसांत अत्यल्प पाऊस

  • मेच्या 18 दिवसांत तूट भरली, विक्रमी पावसाची नोंद

  • 36 पैकी 19 जिल्ह्यांत अतिवृष्टी

पुणे: यंदाच्या उन्हाळी हंगामात एप्रिल अखेरपर्यंत राज्यात पावसाची 90 ते 96 टक्के तूट होती, ती मे महिन्यातील अवघ्या 18 दिवसांत भरून निघाली. उन्हाळी हंगामातील राज्याची सरासरी 17 मि.मी. इतकी आहे. मात्र 18 मेअखेर ती 40 मि.मी. म्हणजे तब्बल 134 टक्के पाऊस जास्त झाला आहे. राज्यात 36 पैकी 19 जिल्ह्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्यात पावसाची सरासरी अत्यल्प होती. मार्च महिन्यात अवघा 4 ते 5 मि.मी . पाऊस झाला. तर एप्रिलमध्ये शून्य टक्के पाऊस झाला. 60 दिवस कडक ऊन होते. त्यात सुमारे 44 दिवस अतितीव्र उष्णतेची लाट होती. त्यामुळे मार्च आणि एप्रिलमध्ये संपूर्ण राज्यात उष्मा खूप जास्त जाणवला. त्याचे कारण यंदा उन्हाळी हंगामातील सरासरी पाऊस मार्च आणि एप्रिलमध्ये झालाच नाही. मे महिन्यात मात्र मान्सूनपूर्व पावसाने बहार आणत ही तूट भरून काढली अन् राज्यातील उन्हाळी हंगामाचा पाऊस 18 मेअखेर 134 टक्के इतका झाला आहे

गत आठ ते दहा वर्षांतील उन्हाळी हंगामातील विक्रमी पाऊस म्हणावा लागेल. कारण यंदा मान्सून अंदमानातच सात- आठ दिवस आधी आला. त्यापुढे केरळ ते महाराष्ट्र असाच प्रवास राहील असे वाटते. मान्सून लवकर सक्रिय झाल्याने मान्सूनपूर्व पाऊसही जोरदार बरसतो आहे. यंदा तो विक्रमी वेळेत म्हणजे 27 मे पर्यंत केरळात दाखल होईल, असे दिसत आहे.
डॉ. अनुपम कश्यपी, निवृत्त हवामान विभागप्रमुख, आयएमडी, पुणे

राज्यातील पाऊस (1 मार्च ते 18 मे 2025)

  • महाराष्ट्र राज्य : सरासरी :17 मि.मी,

  • प्रत्यक्षात पडला : 40 मि.मी. (134 टक्के जास्त)

  • कोकण : (सरासरी :7.5 , पडला :70.5 मि.मी. (840 टक्के जास्त)

  • मध्य महाराष्ट्र : (सरासरी : 15.7 पडला 26.9 मि.मी. (71 टक्के जास्त)

  • विदर्भ ः (सरासरी : 22.2, पडलाः68.9 मी.मी. (210 टक्के)

  • मराठवाडा (सरासरी : 17.2, पडाला : 13.6 मि.मी. (उणे 21 टक्के)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT