पुणे; पुढारी वृत्तसेवा : अवघ्या महिन्याच्या कालावधीत पीएमपीच्या ताफ्यातील 1 हजार 270 बस ब्रेकडाऊन झाल्या आहेत. यात सर्वाधिक स्वमालकीच्या शंभरावर जास्त बसचा समावेश आहे. रस्त्यातच प्रवासी सेवा पुरविताना गाड्या बंद पडत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आधीच्या तुलनेत ब्रेकडाऊन होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
पूर्वी दिवसाला सरासरी 100 बस ब्रेकडाऊन होत असत. महिनाभरात हा आकडा 3 हजारांवर जात असल्याची नोंद पीएमपीकडे होत. सध्या प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्याने तसेच नव्या बस दाखल झाल्याने ब्रेकडाऊनचे प्रमाण निम्म्याने कमी झाले आहे. भविष्यात ब्रेकडाऊन शून्यावर आणले, तर प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा पुरविणे शक्य होणार आहे. मार्च 2023 मध्ये पीएमपीच्या स्वमालकीच्या 686, तर ठेकेदारांच्या 584 बस, अशा एकूण 1270 बस ब्रेकडाऊन झाल्या आहेत.
रोज बंद पडणार्या बस
स्वमालकीच्या : 22
ठेकेदारांच्या : 19
एकूण : 41
स्वमालकीच्या बस
डिझेल – 200
सीएनजी – 791
एकूण स्वमालकीच्या बस – 991
ठेकेदारांच्या (भाडेतत्त्वावरील) बस…
सीएनजी – 640
इलेक्ट्रिक – 454
एकूण ठेकेदारांच्या बस – 1094