पुणे

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत मागील वर्षभरात 12 कोटींचे बेकायदा मद्य जप्त

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील वर्षभरात कारवाई केली. या कालावधीत सुमारे 12 कोटींचे बेकायदा मद्य जप्त केले; तर संबंधितां -वर 1,870 गुन्हे दाखल केले असून, 2006 आरोपींना अटक केली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील वर्षभरात करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा उत्पादन शुल्क विभागाने नुकताच घेतला आहे. त्यामध्ये ही बाब पुढे आली आहे. मद्याची अवैध निर्मिती, वाहतूक आणि विक्री यावर उत्पादन शुल्क विभागाने विक्रमी कारवाया केल्या आहेत. या कारवाईत 1,870 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 2006 आरोपींना अटक करण्यात आली आहेत.

200 पेक्षा जास्त चारचाकी आणि दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच या कारवायांमधून 12 कोटी 23 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली. गेल्या वर्षभरात बेकायदा मद्यविक्री, वाहतूक आणि उत्पादन केल्याप्रकरणी 1,538 गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच 1,568 आरोपींना अटक करण्यात आली होती. 'या कारवायांमधून सात कोटी 91 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात गेल्या वर्षीपेक्षा यंदा पाच कोटी रुपयांचा अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश मिळाले आहे,' असेही राजपूत यांनी सांगितले.

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मंगळवार पेठ, तळेगाव दाभाडे, ताडीवाला रस्ता, पिंपरी-चिंचवड, नारायण गाव आणि सासवड येथे गोदामे आहेत. या गोदामांत कारवायांत जप्त केलेली वाहने, मद्यसाठा, उत्पादनासाठी लागणारे साहित्य असा मुद्देमाल ठेवला जातो. परराज्यातील जप्त केलेले मद्य 33 हजार 807.39 बॅरल, तर गावठी देशी, विदेशी आणि बिअर, अशा एकूण 22 हजार 200.89 बॅरल मद्यसाठा जप्त केला आहे. तसेच चालू वर्षात महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 च्या 68 आणि 84 कलमान्वये एकूण 26 गुन्हे नोंदविण्यात आले असून, त्यामध्ये 84 आरोपींना न्यायालयाने एक लाख 74 हजार 300 रुपयांच्या दंडाबरोबर शिक्षा सुनावली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT