पुणे

पुणे : ‘मेगा ब्लॉक’मुळे एसटीच्या 110 जादा गाड्या; पुणे-मुंबई रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रेल्वे प्रशासनाने कर्नाक पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यामुळे शनिवारपासून (दि.19) मेगा ब्लॉक घेण्यात आला. परिणामी, पुणे-मुंबईदरम्यान धावणार्‍या रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. त्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी प्रशासनाने अतिरिक्त 110 गाड्या पुण्यातून सोडल्या. रेल्वेच्या गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे रेल्वे प्रवाशांचे पुणे-मुंबई प्रवास करण्यासाठी प्रचंड हाल झाले. त्याचा फायदा घेत खासगी वाहनचालकांनी प्रवाशांची लूट केली. त्यामुळे एसटी प्रशासनाने नियमित दररोज धावणार्‍या 350 गाड्यांव्यतिरिक्त 110 गाड्या पुण्यातून मुंबईच्या दिशेने सोडल्या. यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

येथून सुटणार अतिरिक्त गाड्या..
पुणे स्टेशन/ वाकडेवाडी 40 गाड्या
स्वारगेट 70 गाड्या
तर तीनही ठिकाणावरून 350 नियमित गाड्या
मुंबई-पुणे दरम्यान धावणार्‍या एकूण गाड्या 460 एसटी गाड्या

प्रवाशांची ससेहेलपाट…
रेल्वेच्या पुणे-मुंबईदरम्यान धावणार्‍या बहुतांश रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याची माहिती बर्‍याचशा प्रवाशांना माहिती नाही. त्यामुळे पुण्यातील अनेक प्रवासी पुणे रेल्वे स्थानकावर मुंबईला जाण्यासाठी येत आहेत आणि रेल्वे नसल्यामुळे पुन्हा एसटी व अन्य गाड्यांसाठी परतत आहेत. यामुळे प्रवाशांची सामानाच्या बॅगा घेऊन चांगलीच ससेहेलपाट होत आहे.

रेल्वेच्या ब्लॉकमुळे आम्ही प्रवाशांच्या सोयीसाठी ज्यादा 110 गाड्यांचे नियोजन केले आहे. या ज्यादा स्वारगेट, पुणे स्टेशन आणि वाकडेवाडी येथून सुटत आहेत. प्रवाशांनी या गाड्यांमधून पुणे-मुंबई प्रवास करावा.
                                                                            – ज्ञानेश्वर रणावरे,

SCROLL FOR NEXT