पुणे

पुणे : पीएमपीचे आजपासून 10 नवीन मार्ग

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पीएमपी प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन 10 मार्ग सुरू करण्याचे नियोजन केले आहे. तर अगोदरचेच 4 जुने मार्ग विस्तारित करण्याचे ठरविले आहे. हे एकूण 14 मार्ग शुक्रवारपासून (दि. 3) प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू होतील, असे पीएमपी प्रशासनाने सांगितले.

…हे आहेत नवीन मार्ग

1) उरुळी कांचन ते
नांदुरगाव मार्गे सहजपूर फाटा
2) गुजरात कॉलनी ते पुणे स्टेशनमार्गे अ.ब.चौक- सिटी पोस्ट
3) आळंदी ते खराडीमार्गे विश्रांतवाडी, शास्त्रीनगर, चंदननगर
4) येवलेवाडी ते पुणे स्टेशनमार्गे टिळेकरनगर, काकडे वस्ती, मार्केट यार्ड डेपो
5) हडपसर ते पुणे स्टेशनमार्गे
मगरपट्टा, साईनाथनगर, येरवडा

6) शेवाळवाडी ते मनपामार्गे
पुलगेट, पुणे स्टेशन, म.न.पा.
7) आळंदी ते तळेगावमार्गे
चिखली, देहूगाव, इंदोरी
8) घरकुल वसाहत ते पिंपरीगाव मार्गे केएसबी चौक, पिंपरी कोर्ट
9) भोसरी ते चिखलीमार्गे
मोशी मार्केट, बोर्‍हाडे वस्ती
10) भोसरी ते कोथरूड डेपोमार्गे पिंपळे गुरव, औंध, सेनापती बापट रोड

…हे मार्ग होणार विस्तारित

1) हडपसर ते वाघोली हडपसर ते थेऊर कोलवडी या मार्गाचा विस्तार केसनंदगावमार्गे वाघोलीपर्यंत
2) भारती विद्यापीठ ते शनिवारवाडा भारती विद्यापीठ ते स्वारगेट या मार्गाचा विस्तार स्वारगेटच्या पुढे शनिपार, अ.ब.चौक शनिवारवाडापर्यंत
3) राजस सोसायटी ते शिवाजीनगर राजस सोसायटी ते स्वारगेट या मार्गाचा विस्तार स्वारगेटच्या पुढे शनिपार, अ.ब.चौक शिवाजीनगरपर्यंत
4) निगडी ते ग्रीनबेस कंपनी, निगडी ते नवलाख उंबरे या मार्गाचा विस्तार नवलाख उंबरेच्या पुढे ग्रीनबेस कंपनीपर्यंत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT