ऑलम्पिकवीर घडण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल महत्त्वपूर्ण Pudhari Photo
पालघर

ऑलम्पिकवीर घडण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल महत्त्वपूर्ण

पुढारी वृत्तसेवा

पालघर: संपूर्ण कोकणात अत्युच्च दर्जा व आंतरराष्ट्रीय दर्जाची सिंथेटिक धावपट्टी अस लेले जिल्हा क्रीडा संकुल पालघरमध्ये उभे राहत आहे. ऑलम्पिकवीर घडण्यासाठी लागणाऱ्या सर्व क्रीडा सोयीसुविधा पालघर जिल्हा क्रीडा संकुलात उपलब्ध होणार असल्यामुळे भविष्यात या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील खेळाडू ऑलम्पिकवीर घडतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पालघर शहरातील टेंभोडे येथे जिल्हा क्रीडा संकुलाच्या जमिनीवर भव्य दिव्य असे हे क्रीडा संकुल उभे राहणार असून राज्य शासनाने या संकुलाच्या विकासासाठी ३३ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या क्रीडा संकुलाच्या विकासासाठी दर्जेदार ठेकेदाराला कामाचे आदेशही वाटप करण्यात आले आहेत. येत्या काही वर्षात है क्रीडा संकुल तयार होऊन येथील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवण्यासाठी ते महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहे.

भव्य दिव्य परिसरात पसरलेल्या क्रीडा संकुल आवारामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची ४०० मीटर लांबीची सिंथेटिक धावपट्टी तयार केली जात आहे. क्रीडा युवा संचलनालयाच्या मुंबई विभागात अशी धावपट्टी पहिल्यांदाच पालघर मध्ये तयार होत आहे. यासह मोठे फुटबॉल मैदान क्रीडा संकुलात तयार केले जाणार आहे. क्रीडा संकुलामध्ये बहुउद्देशीय क्रीडागृह तयार केले जाणार असून प्रेक्षागृहासह कबड्डी, खो खो, बॅडमिंटन, बुद्धिबळ, टेबल टेनिस, कुस्ती असे पंधराहून अधिक आंतरगृह क्रीडा प्रकाराची व्यवस्था केली जाणार आहे.

गेल्या तीन-चार वर्षामध्ये पालघर जिल्ह्याचा क्रीडा दर्जा सुधारत व उंचावत असून क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय राज्य पातळीवर पालपर जिल्ह्यातील खेळाडूंनी पदके प्राप्त केलेली आहेत. या क्रीडा संकुलावर नऊ वर्षात पहिल्यांदाच १७ व १९ वर्षाखालील व्हॉलीबॉल राष्ट्रीय स्पर्धा पूर्व सराव प्रशिक्षण शिबिरही घेण्यात आले. हा पालघर जिल्ह्यासाठी बहुमान मानला जातो. यासह राज्यस्तरावरील बॉक्सिंग, हॅन्डबॉल, व्हॉलीबॉल, स्केटिंग अशा स्पर्धांचे यजमानपद पालघर जिल्ह्याला प्राप्त होणे ही येथील क्रीडाक्षेत्रासाठी भूषणावह बाब आहे.

पालघर जिल्हा निर्मितीनंतरच्या काड़ी वर्षात पालघर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला मरगळ आली होती. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री, क्रीडा परिषदेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी तसेच तीन वर्षांपूर्वी पालघर जिल्ह्यात आलेले जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला चांगलीच उभारी दिली व ही मरगळ दूर केली. त्यामुळे पालघर जिल्ह्याला राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरीय स्पर्धांचे व सराव प्रशिक्षण शिबिरांचे यजमानपद मिळाले. या सर्वांच्या कष्टाचे फळ म्हणून जिल्हा क्रीडा संकुल तेवढ्याच ताकतीने उभे राहणार आहे. या क्रीडा संकुलातून दर्जेदार क्रीडा प्रशिक्षण मिळणार असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पालघरमधील खेळाडू आपली चमक दाखवतील, असा विश्वासही व्यक्त होत आहे.

• सर्वांच्या प्रयत्नाने उभे राहणारे पालघर जिल्हा क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज (सोमवार) सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. या भूमिपूजननंतर येत्या काळात है क्रीडा संकुल उभे राहणार आहे. पालकमंत्र्यांसह सर्वांनीच यासाठी केलेल्या प्रयत्नांचे येथील खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन राहणार आहे, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

• जिल्हा क्रीडा संकुल उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या क्रीडावृत्ती व क्रीडा क्षेत्राला दिलेल्या प्रोत्साहनामुळे जिल्हा क्रीडा संकुलाच्या उभारणीचा मार्ग मोकळा होत आहे. रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेला दुजोरा देणारे पालघर जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी गोविंद बोडके व जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांचे क्रीडा संकुल उभारण्यासाठी असलेली धडपड व पाठपुरावा या संकुलासाठी महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. यासोबत जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक, क्रीडा क्षेत्रातील मंडळी व क्रीडा विभाग यांचा क्रीडा संकुल उभारणीसाठीचा प्रयत्न यामुळे क्रीडा संकुलाला मूर्त रूप येणार आहे.

• क्रीडा विभागाने दिलेल्या प्रोत्साहनामुळे पालघर जिल्ह्यातील खेळाडूंनी वैयक्तिक व सांघिक गटामधून थलेटिक्स, योगासन, सायकलिंग, जलतरण, कुस्ती, बॅडमिंटन, खो-खो, कबड्डी अशा क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरावर पदके प्राप्त केली असून खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठीही पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने व क्रीडा विभागाचे प्रयत्न आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT