प्रस्तावित सामान्य रुग्णालय, पर्यटन स्थळ गिळणार का ? (pudhari photo)
पालघर

प्रस्तावित सामान्य रुग्णालय, पर्यटन स्थळ गिळणार का ?

पुढारी वृत्तसेवा

मोखाडाः हनिफ शेख

मोखाडा, जव्हार, विक्रमगड येथील आरोग्य व्यवस्था अधिक सरक होण्यासाठी या भागात एक अद्ययावत मोठे रुग्णालय असावे अशी या भागाची निकडीची गरज होती. याला मान्य करीत हे २०० खाटांचे सामान्य रुग्णालय याची खऱ्या अर्थाने सुरुवात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जव्हार दौऱ्यानंतर झाली. या रुग्णालयाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती मात्र जागेची अडचण होती आहे. आता ७ ऑक्टोबर रोजी जागा उपलब्ध बावत निवासी अप्पर जिल्हाधिकारी यांनी आदेश काढला मात्र यासाठी निवडलेल्या जागेवरून आता खऱ्या अर्थाने वाद समोर आला असून पर्यटना बाबत महत्त्वाचा समाजाला जाणारा जव्हार शहरातील हनुमान पॉइंट या प्रसिद्ध पर्यटन स्थळाच्या जागेवर हे रुग्णालय होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे.

याला जव्हार शहरातील नागरिकांनी विरोध केला असून तसे पत्र देखील पालकमंत्री यांना दिलेले आहे यामुळे हे होवू घातलेले २०० खाटाचे सामान्य रुग्णालय एक चांगले पर्यटन स्थळ गिळणार आहे काय असा सवाल आता येथील नागरिकांना पडला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जव्हार तालुक्याचा दौरा केला होता त्यावेळी येथे मेडीकल कॉलेज आणि अद्यायावत रुग्णालय व्हावे अशी मागणी आमदार सुनील भुसारा यांनी केली होती. अशा वेळी या रुग्णालयास मंजुरी मिळाली मात्र यासाठी जागेची मोठी अडचण निर्माण झाली होती. यावेळी जव्हारचे राजे यांनी त्यांच्या मालकीची जागा देवू केली होती.

मात्र काही तांत्रिक कारणामुळे ती प्रक्रिया पुढे न गेल्यामुळे नव्या जागेचा शोध सुरू होता. अशा वेळी आता जव्हारच्या पर्यटन स्थळाच्या यादीतील सर्वात महत्त्वाचं नाव असलेल्या हनुमान पॉइंट येथील जागेत हे रुग्णालय होणार असल्याचे निश्चित झाले आहे.मात्र याला याआधी जव्हार शहरातील काही नागरिकांनी विरोध केला असून रुग्णालय गरजेचे आहेच मात्र पर्यटन सुध्दा जपले पाहिजे अशी यामागची भूमिका आहे .ऐवढेच काय तर श्रीराम मंदिर ट्रस्ट कडील जागा आम्ही या रुग्णालयासाठी मोफत देत असल्याचे पत्र हा मंडळाने दिले आहे यामुळे याचा विचार व्हायला हवा होता. मात्र तरी सुध्दा सदरची जागा देवू केल्याने नव्या वादाला तोंड फुटणार आहे . कारण सध्या जव्हार तालुक्याला मिनी महाबळेश्वर संबोधले जाते .

यामुळे दरवर्षी अनेक पर्यटक या भागात येत असतात. अशा वेळी येथील पर्यटनात हेच हनुमान पॉइंट मानाचा शिरपेच समजला जातो. अतिशय उंचीवर असलेले हे ठिकाण असून शहरातील वयस्क मंडळी, नागरीक याठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत असतात यामुळे आता येथेच जर हे रुग्णालय झाले तर मात्र जव्हार पर्यटन स्थळ मधील हनुमान पॉइंट हे प्रसिद्ध पर्यटन स्थळच नामशेष होईल हे नक्की.

रुग्णालय नक्कीच झाले पाहिजे मात्र हनुमान पॉईंट येथे रुग्णालयाचे बांधकाम झाल्यास हनुमान पॉईंटची मोठ्या प्रमाणात हानी होईल.
- पारस संजय सहाणे, पर्यटन प्रेमी, जव्हार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT