Crime News pudhari photo
पालघर

Virar Crime: चारित्र्यावर संशय, घटस्फोटाच्या धमक्या; विरारमध्ये विवाहितेच्या मृत्यूनंतर पतीवर कारवाई

याप्रकरणी बोळींज पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

नालासोपारा: विरार पश्चिमेकडील म्हाडा येथे नालासोपारा लिंक रोड परिसरात चारित्र्यावर संशय घेऊन तसेच किरकोळ कारणांवरून घटस्फोट देण्याची धमकी देत मानसिक त्रास दिल्याने पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी बोळींज पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

मयत विवाहितेचा पती हा लग्न झाल्यापासून तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तसेच किरकोळ कारणांवरून तिला घटस्फोट देण्याची धमकी देऊन मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे. या मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरातील हॉलमधील सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आरोप करण्यात आले आहे.

या प्रकरणी पतीविरुद्ध बोळींज पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला. १७ जुलै रोजी दुपारी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT