Jarimari Mata Navratri 2026 Pudhari
पालघर

Jarimari Mata Navratri 2026: श्री जरीमरी माता उमेळमान नवरात्रोत्सव

यंदाही भाविकांचा मोठा जनसागर लोटण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

​वसई: वसई तालुक्यातील उमेळमान गावातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री जरीमरी माता मंदिरामध्ये यंदाचा नवरात्रोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडणार आहे.

भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी आई जरीमरी मातेच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांचा मोठा जनसागर लोटण्याची शक्यता आहे. ११ ऑक्टोबर २०२६ ते १९ ऑक्टोबर २०२६ या नऊ दिवसांच्या कालावधीत हा मंगलमय उत्सव साजरा केला जाणार आहे.

या पावन पर्वामध्ये मातेच्या मंदिराचे कवाड दररोज सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत दर्शनासाठी उघडे राहतील. दररोज सकाळी आणि रात्री ७.३० वाजता होणाऱ्या महाआरतीची दिव्य प्रभा आणि मातेचे रूप भाविकांचे मन प्रसन्न करणारे असेल.

नऊ रात्रींच्या भक्तीमय प्रवासात रोज रात्री ९ ते १२ या वेळेत भजनाचे सूर घुमणार असून, महिला वर्ग नऊ दिवसांच्या नऊ रंगांच्या पेहरावात या आनंदात हिरिरीने सहभागी होणार आहे.

​कल्याण, वांद्रे, ठाणे, मालाड-चारकोप, नालासोपारा, वसई, जुचंद्र आणि उमेळमान या विविध भागांतून सर्व धर्मीय व सर्व धर्मीय भाविक मातेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात. उमेळमान गावची ही अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा अधिक वैभवशाली करण्यासाठी श्री जरीमरी ट्रस्टचे सेक्रेटरी रमेश म्हात्रे आणि अध्यक्ष गजानन पाटील यांच्यासह सर्व कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत.

मातेचा हा कृपाप्रसाद आणि दर्शनाचा सोहळा अनुभवण्यासाठी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आपुलकीचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT