पालघर : बोईसर विधानसभा मतदार संघातील पाच तपासणी नाक्यांवरील वसई फाटा तपासणी नाक्यावर तपासणी दरम्यान चार लाखांची रोख रकम जप्त करण्यात आली आहे. मतदार संघात रस्ते मार्गावर उभारण्यात आलेल्या तीन तपासणी नाक्यांवर वाहनांची तर बोईसर आणि सफाळे रेल्वे स्थानकातील तपासणी नाक्यांवर प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. दरम्यान बुधवारी केंद्रीय निरीक्षकांनी टीमा सभागृहातील निवडणूक कार्यालयाला भेट देत निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला. निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर बोईसर विधानसभा मतदार संघात पाच ठिकाणी तपासणी नाके सुरू करण्यात आले आहेत. तीन तपासणी नाके रस्ते मागाँवर तर दोन बोईसर विधानसभा मतदार नाके रेल्वे स्थानकांवर उभारण्यात आले आहेत. पाचही तपासणी नाक्यांवर दिवस रात्र वाहने आणि प्रवाशांची तपासणी केली जात आहे. रेल्वे मागाँवर बोईसर रेल्वे स्थानक आणि सफाळे रेल्वे स्थानक तर रस्ते मार्गावर टेन नाका, चिल्हार फाटा आणि वसई फाटा येथे तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. नुकताच वसई फाटा येथील तपासणी नाक्यावर चार लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. बोईसर विधानसभा क्षेत्रात मतदारांना प्रलोभने देण्यासाठी केल्या जाणारे गैर प्रकार रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती बोईसर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनील माळी यांनी दिली.
संघासाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी सुहास एल वाय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी त्यांनी बोईसरच्या टीमा सभागृहातील निवडणुक कार्यालयाला भेट देत निवडणुक प्रक्रियेचा आढावा घेतला. परिसरात पोलीस फौज तैनात करण्यात आला आहे.
आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या राज्यातील विविध अंमलबजावणी यंत्रणांनी ही कामगिरी केली आहे. विविध ठिकाणी पोलीस विभाग आणि इतर यंत्रणांनी उभारलेले तपासणी नाके योग्य पध्दतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे. मतदारांना आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास आयोगाच्या 'सी-व्हिजील' पवर तक्रार करता येते. या तक्रारींची माहिती सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिली जात असल्याने आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे.