woman assault case file photo
पालघर

Vasai crime : वसईतही भोंदूचा अवतार; महिलेवर अत्याचार

माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

नालासोपारा : स्वतः “महादेवाचा अवतार” असल्याचा खोटा दावा करत महिलेचा विश्वास संपादन करून तिला गुंगीचे औषध देत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या ऋषिकेश श्रीकांत वैद्य (40) या भोंदूचा पर्दाफाश झाला असून माणिकपूर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अत्याचाराचा हा प्रकार 31 डिसेंबर 2023 रोजी घडला. हा ऋषीकेश महादेवाचा अवतार असल्याचे महिलेला पटले आणि ती त्याच्या सोबत चक्क पुण्याला गेली. मांजरी परिसरातील एका लॉजमध्ये प्रसादातून त्याने तिला गुंगीचे औषध दिले व नंतर शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

या दरम्यानचे आक्षेपार्ह फोटोही काढले. त्याआधारे तिला ब्लॅकमेल करून पुन्हा बोलावले. 11 मे 2025 रोजी आरोपीने, भेटली नाही तर अक्षेपार्ह फोटो तिच्या पतीला पाठवण्याची धमकी दिली. वसई पश्चिम येथील एका नामांकित हॉटेलमध्ये जबरदस्तीने शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीने सांगितले आहे. पोलीस आता भोंदू बाबाच्या या वसईतील अवताराचा शोध घेत आहेत.

भोंदू खरातचे कार्यालय सील

नाशिक ः अनेक महिलांचे शोषण केल्याचा आरोप असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात विशेष तपास पथकाने त्याचे ‌‘ओकस कार्यालय‌’ आणि त्याच्या ‌‘शिवनिका‌’ संस्थेचे बँक खाते सील केले आहे. गुरुवारी या पथकाने कार्यालयात सापडलेल्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली. त्यातून मोठे धागेदोरे मिळू शकतात. खरातच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची माहिती गोळा केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT