पालघर

राज्याच्या जलसंपदा विभागात विविध १६ हजार पदे रिक्त

Arun Patil

पालघर, मंगेश तावडे : राज्याचा जलसंपदा विभाग महत्त्वाचा समजला जातो. मराठवाडा व विदर्भ या विभागांत दरवर्षी दुष्काळजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागते. कोकण विभागातही एप्रिल व मे महिन्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पाणी वितरणाचे काम करणार्‍या जलसंपदा विभागात सध्याच्या स्थितीत गट 'क' व गट 'ड' वर्गात सुमारे 11 हजार रिक्तपदे असून, यामुळे जलसंपदा विभागांतर्गत होणारी अनेक कामे मंदावली आहेत.

दुष्काळ व पाणीटंचाईवर मात करायची असेल, तर जलसंपदा विभागाची कार्यक्षमता वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी जलसंपदा विभागातील रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. या विभागात अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असून, गट 'क' आणि गट 'ड' वर्गाची भरती गेल्या 2013 पासून झाली नाही. यामुळे या विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदांची संख्या वाढली आहे.

माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार गट 'क' वर्गाची – सरळसेवा – 8014, पदोन्नती- 3163 अशी एकूण- 11 हजार 177 पदे रिक्त आहेत, तर गट 'ड' वर्गाची सरळसेवा-4702, तर पदोन्नतीने- 306 एकूण- 5008 पदे 31 मार्च 2023 पर्यंत रिक्त होती. 31 मार्च 2023 ते 30 जून 2023 या कालावधीत या रिक्त पदांच्या संख्येत वाढ झाली आहे. यात प्रामुख्याने, गट 'क' वर्गातील महत्त्वाच्या पदांची रिक्त असलेली संख्या: गट 'क' वर्गातील पदे- प्रथम लिपिक-55, आरेखक-144, भांडारपाल-68, सहायक आरेखक-191, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक-2571, वरिष्ठ लिपिक 705, अनुरेखक-976, संदेशक-190, टंकलेखक-53, वाहनचालक-824, कनिष्ठ लिपिक-1968, सहायक भांडारपाल-181, दप्तरी कारकून-537, मोजणीदार-951, कालवा निरीक्षक-1471,

जलसंपदा विभागातील गट 'ड' वर्गातील मार्च 2023 पर्यंत रिक्त पदे नाईक-245, शिपाई-2357, चौकीदार-1057, कालवा चौकीदार-784, कालवा टपाली-330, प्रयोगशाला परिचर-152, दप्तरी-6 ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत.

या विभागाची गट 'क' व गट 'ड' वर्गाची रिक्त पदे भरण्यासंदर्भात 2013 पासून एकही जाहिरात न आल्याने रिक्त पदांची संख्या वाढली असून, ही पदे यावर्षी तरी भरावीत, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे कोकण विभाग कृषी पदवी व पदविकाधारक संघर्ष समितीने निवेदनाद्वारे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT