तलासरी ःतलासरी पोलिसांनी कारवाई करून गुजरात महाराष्ट्र सीमेवरील संभा येथे इराणी फार्म जवळ बंद घरात गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली. त्याच्याकडून तब्बल 2 किलो 965 ग्राम वजनाचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.
मोहम्मद चांगेज हाजी अब्दुल रौफ शेख उर्फ मोईउद्दीन रौफ शेख (36) अतिश गणेश कुमारे (28) सोळसुभा उंबरगाव असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहे. या दोघां विरोधात तलासरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तलासरी पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडुन प्राप्त झालेल्या माहितीनुसार तलासरी तालुक्यातील महाराष्ट्र गुजरात सीमेवरील सांभा येथील इराणी फार्म हाऊस येथे बंद घरात अंमली पदार्थाची बेकायदेशिररीत्या विक्री होत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती.
सदरची माहिती प्राप्त होताच पोलीस अधीक्षक यतीन देशमुख, उप विभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई करीत संभा येथील इराणी फार्म हाऊस जवळ बंद घरात झाडाझडती घेऊन गांजा विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून अंमली पदार्था व इतर साहित्य जप्त करण्यात आले.