पालघर : जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण व महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या संयुक्त भागीदारीतून उभ्या राहणाऱ्या हरित वाढवण बंदर प्रकल्पासाठी सागरी मंडळाचा हिश्यातील असलेला निधी देण्याकरता मंजुरी मिळालीआहे.
बंदर प्रकल्पसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या २६ टक्के सहभागाची ३४०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. राज्य मंत्रिमंडळाने २० मार्च २०२५ रोजी या खर्चाला मंजुरी दिली व ७ एप्रिल रोजी त्याबाबतचा शासन निर्णय पारीत झाला.
वाढवण बंदर प्रकल्प हे जवाहरलाल नेहरू पतन प्राधिकरण व महाराष्ट्र सागरी मंडळ संयुक्त भागीदारीतून उभारण्यात येणार असून या प्रकल्पासाठी ७६ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यात या प्रकल्पासाठी होणाऱ्या खर्चाची उपयोगिता राज्य शासनाला सादर करणे व इतर अटी या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहेत.
वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड मार्फत बंदर उभारण्यासाठी २७, २८३ कोटी रुपये कर्ज उभारण्यात येणार असून या प्रक्रियेत महाराष्ट्र सागरी मंडळ मार्फत समभागाच्या अनुषंगाने ७०९४ कोटी रुपयांच्या कर्ज घेण्याच्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाला या निर्णयामध्ये मान्यता देण्यात आली आहे.