NASA Artemis 2 Pudhari
पालघर

NASA Artemis 2: शंकरपाडा निसर्गशाळेच्या विद्यार्थ्यांची नावे आता चंद्राच्या कक्षेत!

नासाच्या अर्टेमिस-2 मोहिमेत 274 विद्यार्थी व 11 शिक्षकांचा मानाचा सहभाग; आदिवासी भागातून अंतराळविश्वात ऐतिहासिक झेप

पुढारी वृत्तसेवा

वाणगाव : जि.प.प्राथ.व माध्य.शंकरपाडा निसर्गशाळेने अंतराळविश्वात 2019/20च्या मार्समोहिमेनंतर आत्ता चंद्रयान अर्टेमिस-2 मोहिमेत मानाचा ठसा उमटवला आहे. नासाने व्हर्च्युअल गेस्ट-सेंड युवर नेम टू द मून या आंतरराष्ट्रीय उपक्रमांतर्गत जगभरातील नावे डिजिटल स्वरूपात अंतराळात पाठवली जातात. नासाने केलेल्या आवाहनांती यशस्वी नोंदणीनंतर शाळेच्या274 विद्यार्थी व 11शिक्षकांना अधिकृत बोर्डिंग पास प्राप्त झाले असून राष्ट्रपती पुरस्कारार्थी बहुगुणी शिक्षक विजय हणमंतराव वाघमारे यांनी पुढाकार घेऊन नासाच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी केल्यामुळे आदिवासी दुर्गमभागातील विद्यार्थ्यांची नावेआता चंद्राच्या कक्षेत झेपावणार आहेत.

विद्यार्थ्यांची नावे एका एसडी कार्ड मध्ये संग्रहित करून तीओरियन यानाद्वारे चंद्राभोवतीच्या मोहिमेत पाठवली जाणार असून मोहिमेचे प्रक्षेपण ऑनलाईन पाहण्याची संधी त्यांना मिळणार आहे.या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व अवकाश संशोधनाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.अर्टेमिस-2 मोहीम एप्रिल 2026 पूर्वी फ्लोरीडातील कॅनेडी स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित होणार असून सुमारे6,85,000 मैलांचा प्रवास करून अंतराळवीर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून पॅसिफिक महासागरात परत येणार आहेत.

खान अकॅडमीतर्फे डॉ.जयंत नारळीकर गणित विज्ञान समृद्धी कार्यक्रमांतर्गत गणित/विज्ञान तंत्रज्ञानाची माहिती/व्हिडिओमुळे विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी निर्माण होत असून त्याचाच सकारात्मक परिणाम म्हणून अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या ऑनलाईन पोर्टलवरून अधिकृतरित्या शंकरपाडा निसर्गशाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांची नावे आता चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणार आहेत.
सोनाली मातेकर, शिक्षणाधिकारी, जि.प.पालघर
अर्टेमिस-2मोहिमेत रीड वायस्मन, विक्टर ग्लोव्हर,क्रिस्टीना कोच,जेरेमी हॅन्सन हे चार अंतराळवीर 10 दिवसाची चंद्राभोवतीची मोहीम पूर्ण करणार आहेत.भविष्यातील चंद्रावरील मानवी मोहिमांसाठी आवश्यक तंत्रज्ञानाची चाचणी या मोहिमेत केली जाणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या जिज्ञासूवृत्तीला चालना मिळेल तसेच वैज्ञानिकदृष्टीकोन जाणीवजागृती होईल.नासाच्या या ऐतिहासिक मोहिमेत विद्यार्थ्यांची नांवे पाठवण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंद निर्माण झाला आहे.
संजय वाघ, गटशिक्षणाधिकारी डहाणू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT