Palghar News Pudhari
पालघर

Palghar News: विराज प्रोफाइल लिमिटेडच्या अधिकाऱ्याने राहत्या घरी संपवल जीवन

बोईसर पूर्वेतील रूपरजत पार्क परिसरातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

संदीप जाधव

बोईसर: बोईसर पूर्वेकडील रूपरजत पार्क, सेक्टर क्रमांक २ येथील राहत्या घरी विराज प्रोफाइल लिमिटेड कंपनीतील वरिष्ठ अधिकारी प्रदीप जाधव (वय ५८) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जाधव हे अनेक वर्षे संबंधित कंपनीत जबाबदारीच्या पदावर कार्यरत होते. सायंकाळच्या सुमारास त्यांनी आपल्या निवासस्थानी टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, जाधव यांच्या आत्महत्येमागील कारणांबाबत विविध चर्चा सुरू असून कामाचा ताण तसेच इतर काही बाबींबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.

या प्रकरणी संबंधित कुटुंबीय, सहकारी आणि कंपनी प्रशासन यांची भूमिका समोर येणे अपेक्षित असून तपासानंतरच घटनेमागील सत्य परिस्थिती स्पष्ट होणार आहे. बोईसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT