File Photo
पालघर

सखा भाऊ पक्का वैरी! भावानेच काढला भावाचा काटा

शिवसेना नेते अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला

पुढारी वृत्तसेवा

पालघर : गेली बारा दिवस बेपत्ता असलेले शिवसेना पक्षाचे तलासरी येथील माजी पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह गुजरात राज्यातील भिलाड शहरातील मालपाडा या ठिकाणी बंद खाणीत सापडला. त्यांच्या गाडीसह त्यांचे अपहरण करून त्यांचा खून केल्याबाबत तक्रार घोलवड पोलीस ठाण्यात 27 जानेवारी रोजी नोंदविण्यात आली होती. अवघ्या चार दिवसात स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने तांत्रिक मुद्द्याच्या आधारे शोध घेत मृतदेह आणि त्यांच्या गाडीचा शोध घेतला.

या प्रकरणांमध्ये अशोक धोडी यांचा सक्का भाऊ अविनाश धोडी यांच्यावरती मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल केला आहे. दारू तस्करीच्या प्रकरणातून तसेच कौटुंबिक वादातून अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला आहे. असे अशोक धुळे यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

या प्रकरणात पालघर पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. तर चार आरोपी अद्यापही फरार आहेत. मुख्य आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता ते पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाले. मुख्य आरोपी अविनाश याचा दारू तस्करीचा व्यवसाय होता. भावाने त्याच्या विरोधात पोलीसात तक्रारी केल्या होत्या. त्याचा राग मनात धरून होता. तसेच घरगुती वाद जमिनीचे वाद देखील होते. याचा वचपा काढण्यासाठी अविनाश याने हा खून केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT