तलासरीत स्थलांतरित परदेशी दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन Pudhari
पालघर

तलासरीत स्थलांतरित परदेशी दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन

कुर्से धरणक्षेत्रात दुर्मीळ पक्ष्यांचे वास्तव्य

पुढारी वृत्तसेवा
तलासरी : सुरेश वळवी

पालघर जिल्ह्यात भरभरून पक्षी वैभव लाभले आहे. समुद्र किनारा, खाडीपट्टा खारफुटीचा प्रवेश, मिठागरे, भातशेती, शहरी भाग, आर्द्र व मिश्र पानगळीचे जंगल असे विविध पक्षी अधिवास या ठिकाणी आहेत. त्यामुळे येथे पक्ष्यांची विविधता ही मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. दरवषी थंडी पडू लागली की येथे मोठ्या प्रमाणात प्रदेशातील पाहणे पाणपक्षी स्थलांतर करून या भागात येतात.

तलासरी तालुक्यातील कुर्से धरण परिसरात पाहुण्या पक्ष्यांची वर्दळ वाढलेली आहे. स्वौविहार करणाऱ्या रंगीबेरंगी विविध जातीच्या आकषर्क पक्ष्यांच्या मनमोहक हालचाली पाहण्यासाठी परिसरात पक्षीप्रेमी येत आहेत. कुर्ज्ञे धरण परिसरात हिवाळी हंगामात विविध स्थलांतरीत पक्षांची गर्दी वाढते त्यामध्ये जलचर पक्षांची संख्या अधिक असतात हिवाळ्याचा हंगाम अंतिम टप्यात आला असूनही पाहुण्या पक्ष्यांचा मुकाम धरण परिसरातच कायम आहे.

किनाऱ्यावरील गवत, धरणातील विविध वनस्पतीवर विविध प्रकारचे पक्षी मोठ्या प्रमाणात नजरेत पडू लागले आहेत. या आकर्षक अनाहुत पाहुण्या पक्ष्यांची वर्दळ परिसरात दिसत आहे. यामध्ये लहान करकोचे, लहान, मध्यम व मोठे बगळे, वंचक, सूरय, तुतारी, राखी, जांभळे बगळे, पाणडूबी, काळ्या डोक्याचा शाराटी, टिटवी व पाणकोंबड्या आदी छोट्यामोठ्या आकाराच्या पक्षी मुक्त विहरताना नजरेत पडतात.

याशिवाय धरणात, भारतात निवासी असलेली परंतु या ठिकाणी स्थानिक स्थलांतर करून आलेली अडई- लेसर व्हसालिंग डक, धनवर (हळदीकुंकू बदक) स्पॉट बिल्ट डक, काणूक- कॉटन पीग्मी गुज इत्यादी विविधरंगी रानबदके आढळून आली आहेत. या धरणात परदेशी स्थलांतरीत रानबदकानीही हजेली लावली यामध्ये लालसरी (कॉमन पोचार्ड) लाल माथ्यामुळे उठून दिसणारे हे मध्यम आकाराचे बदक उत्तर व मध्य युरोपातील, तलवार बदक (नॉर्दन पिनटेल) टोकदार शेपटी मुले उठून दिसणारे हे मध्यम आकाराचे बदक उत्तर अमेरिका, आशिया व युरोप, चक्रंग (कॉमन टील) चेहऱ्यावरील हिरवट लासर पट्ट्यामुळे उठून दिसणारे हे लहान आकाराचे बदक युरोप व रशियात, गडवाल मध्यम आकाराचे हे बदक उत्तर अमेरिका, आशिया व युरोप भुवई बदक (गार्गन) उठावदार भुवईमुळे यास ओळखणे सोपे जाते आशिया व युरोपातील या पक्ष्यांचा समावेश आहे.

पक्षी अभ्यासक सचिन मेन यांना जानेवारी २०१६ ला सर्वप्रथम हे परदेशी पक्षी नजरेस पडले होते. डिसेंबर महिन्यात कडाक्याच्या थंडीत धरण परिसरात पक्षी निरीक्षण करताना परदेशी स्थलांतरीत नयनसरी (फेरुजिनस पोचार्ड) या दुर्मिळ पक्ष्याचे दर्शन घडले होते. या वर्षी ही प्रदेशी पाहुण्या पक्षांचे दर्शन धारण परिसरात झाले असून त्यांच्याबरोबर चॉकलेटी वर्णाच्या या दुर्मिळ परदेशी स्थलांतरीत रानबदकाने येथे दर्शन दिल्याने पक्षीमित्रांत या धरणाविषयी कमालीचे आकर्षण निर्माण झाले आहे.

इतर रानबदके मोठ्या संख्येने या धरणात दिसत असली तरी नयनसरीने मात्र एकट्यानेच दर्शन दिले असे पक्षी अभ्यासक अभ्यासकांनी पुढारीला माहिती दिली आहे. युरेशियात दलदली व तळ्यांच्या ठिकाणी हा पक्षी आढळतो. जलीय वनस्पती, पानकीडे, शिंपले, छोटाले मासे खाऊन ते उदरभरण करतात. डुबी मारून पाण्यावर हिंडत ते खाद्य शोधतात. पालघर जिल्ह्यात २०१६ जानेवारी मध्ये हा पक्षी प्रथमच दिसल्याचे मेन यांनी नमूद करत पुढे जानेवारी २०१८ मध्ये हा पक्षी जोडीने दिसल्याचे सांगितले होते तर मधल्या काळात हे पक्षी या परिसरात दिसले नव्हते या वर्षी पुन्हा या परदेशी पक्षांचे दर्शन धारण परिसरात झाले आहे. पक्षी प्रेमींनी याठिकाणी अवश्य भेट द्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT