संग्रहित  file photo
पालघर

ट्रेनमधील प्रवासादरम्यानच्या मैत्रीनंतर लॉजमध्ये नेऊन बलात्कार

Dombivli | मैत्रीनंतर लॉजमध्ये नेऊन तरुणीवर बलात्कार

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याणमधील लॉजवर नेऊन २१ वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी अभिजीत सर्जेराव जोगदंड (२५) याला कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी परभणी येथून अटक केली आहे. त्याला शुक्रवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत अर्थात आधारवाडी कारागृहात करण्यात आली आहे. हा सारा प्रकार ऑगस्ट महिन्यात घडला होता.

आरोपी अभिजीत हा मूळचा परभणीतील राहणारा आहे. तर पिडीत तरूणी नांदेड जिल्ह्यातील एका गावात राहणारी आहे. ऑगस्ट महिन्यात रेल्वेत प्रवासादरम्यान या तरूणीसोबत अभिजीतची ओळख झाली. त्याने या तरूणीला कल्याण रेल्वे स्थानकात उतरविले. त्यानंतर तो तिला लॉजवर घेऊन गेला. मात्र तेथील वातावरण पाहून तरूणी घाबरली. तिने विरोध करत लॉजमधून निघण्यासाठी आरोपी अभिजीत याच्याकडे तगादा लावला. मात्र त्याने तू टेन्शन घेऊ नकोस, मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे अमिष दाखवून तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने त्याचे मामा- मामी बदलापूरला राहत असून त्यांच्याकडे जाऊ, अशी या तरूणीला बतावणी केली. मामा- मामीच्या घरी नेण्याऐवजी बदलापूरात नेले आणि थांब जरा जाऊन येतो, अशी थाप मारून या तरूणीला कुठे तरी सोडून हा पठ्‌ठ्या पसार झाला बराच वेळ झाला तरी अभिजीत येत नसल्याने तरूणीने त्याच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अल्पावधीत झालेल्या ओळखीनंतर लग्नाचे अमिष दाखवून लैंगिक संबंध प्रस्थापित तर केलेच, शिवाय अनोळखी परिसरात सोडून आपली फसवणूक केल्याची खात्री पटल्यानंतर या तरूणीने कल्याणचे महात्मा फुले चौक पोलिस ठाणे गाठले. आपल्यावर बेतलेल्या प्रसंगाची कहाणी तिने पोलिसांसमोर कथन केली. पोलिसांनी पिडीतेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून फरार अभिजीत याला हुडकून काढण्यासाठी तपास चक्रांना वेग दिला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरिक्षक प्रतिभा माळी करत आहेत.

कारागृहात रवानगी

आरोपी अभिजीत जोगदंड परभणीत लपल्याची खात्री पटल्यानंतर पोलिस अधिकारी किरण वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शोध घेऊन त्याला अटक केली. शुक्रवारी त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपीची ओळख परेड करण्यासाठी पोलिसांनी पोलिस कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली. मात्र न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आरोपी अभिजीत जोगदंड याची रवानगी कल्याणच्या आधारवाडी कारागृहात करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT