Pre-wedding photo shoot | प्री-वेडिंग फोटोग्राफीने लग्नाचा खर्च दीड लाखाने वाढला Pudhari
पालघर

प्री-वेडिंग फोटोग्राफीने लग्नाचा खर्च दीड लाखाने वाढला

Pre-wedding photo shoot | छायाचित्रण व्यावसायिकांसाठी नवीन संधी; नातेवाईक, मित्रमंडळींना स्क्रिनवर दाखविण्याची प्रथाच रुढ

पुढारी वृत्तसेवा

विक्रमगड : गेल्या काही वर्षांपासून लग्नाआधी प्री-वेडिंग, फोटोशूटकडे जोडप्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचाही कल वाढलेला आहे. लग्नाआधीच्या आपल्या सुवर्णक्षणांना कायम लक्षात ठेवण्यासाठी तसेच आपल्या आठवणीना चिरतरुण ठेवण्यासाठी अनेकजण प्री-वेडिंग फोटोशूटचे माध्यम निवडत असतात. लग्ग्राआधीचे प्री-वेडिंग फोटोशूट हे खास आठवणी जपण्याचा उत्तम मार्ग आहे आणि ती आज एक फॅशनही बनली आहे. त्यासाठी एक ते दीड लाखाचा खर्च देखील केला जात आहे.

पूर्वी वधू-वराच्या हातावरील मेहंदी रंगली तर त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे, असे म्हटले जायचे. पण, आता लग्न एक इव्हेंट झाला आहे. इतकेच नव्हे तर या काळात प्री-वेडिंग फोटो शूटपासून ते लग्नापर्यंत अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्यावर लाखोंचा खर्च होतो. यात सर्वाधिक भर प्री वेडिंगवर दिला जातो. ती आजकाल एक फॅशनही बनली आहे. त्यामुळे नव वधू-वर लग्रापूर्वी प्री- वेडिंग फोटोशूट करून लग्र सोहळ्यात एका मोठ्या स्क्रीनवर नातेवाईक, मित्रमंडळींना दाखविण्याची प्रथाच रुढ होत चालली आहे.

लग्नाआधी प्री- वेडिंग, फोटोशूटकडे जोडप्यांसह त्यांच्या कुटुंबीर्याचाही कल वाढलेला आहे. लग्नाआधीच्या सुवर्णक्षणांना कायम लक्षात ठेवण्यासाठी ही एक फॅशन बनत आहे. प्री-वेडिंग शूटसाठी स्टायलिश सलवार सूट हा उत्तम मार्ग आहे. यामुळे आपले व्यक्तीमत्त्व अधिक उठून दिसते. प्री-वेडिंग शूट दरम्यानचे तुमचे फोटोही अधिक चांगल्या प्रकारे शूट होऊ शकतील. लग्नापूर्वी समुद्र किनारी तसेच प्री-वेडींगसाठी उभारलेल्या स्टुडिओमध्ये जाऊन फोटोग्राफी, अल्बम, ड्रोन शूटिंग केले जाते. त्यासाठी किमान एक ते दीड लाख रुपये खर्च येतो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT