भाताणे वनपरिक्षेत्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाडसी कारवाई करत दोघांना अटक केली. Pudhari
पालघर

Leopard Poaching Vasai | वसईत बिबट्याच्या कातडीसह दोघांना अटक; भाताणे वनपरिक्षेत्राची धाडसी कारवाई

Vasai Crime | खानिवडे टोलनाक्याजवळील धोकादायक ठिकाणी कारवाई करत दोघे जण ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

Leopard Skin Seizure Palghar

खानिवडे : वसई परिसरात बिबट्याच्या कातडीच्या तस्करीचा प्रकार उघडकीस आला असून भाताणे वनपरिक्षेत्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाडसी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. या कारवाईदरम्यान बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली.

वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वसई पूर्वेतील भाताणे वनपरिक्षेत्राला गुप्त सूत्रांद्वारे बिबट्याची कातडी विक्रीसाठी आणली जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार वनाधिकारी विजय बारब्दे आणि वनपाल नितिन खुळपे यांनी ग्राहक असल्याचे भासवून सापळा रचला. इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांनी खानिवडे टोलनाक्याजवळील अंधाऱ्या व धोकादायक ठिकाणी कारवाई करत दोघांना कातडीसह ताब्यात घेतले.

याआधीही १४ जानेवारी रोजी याच पथकाने मांडवी वनपरिक्षेत्राच्या सहकार्याने मांडूळ (सॅंड बोआ) सापाच्या तस्करीचा प्रयत्न उधळून लावत तिघांना अटक केली होती. त्या वेळी आरोपींकडून एक कार आणि दुर्मिळ प्रजातीचा साप जप्त करण्यात आला होता.

वन्यजीव संरक्षणासाठी १९७२ चा वन्यजीव संरक्षण कायदा लागू असून, त्याअंतर्गत वाघ, सिंह आणि बिबट्या यांसारख्या प्राण्यांना विशेष संरक्षण देण्यात आले आहे. अशा प्राण्यांची शिकार, कातडी किंवा इतर अवयवांची खरेदी-विक्री करणे हा गंभीर व दंडनीय गुन्हा आहे. अशा प्रकरणांत दोषी आढळल्यास किमान ३ वर्षे ते कमाल ७ वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद आहे. पुनरावृत्ती झाल्यास शिक्षा अधिक कठोर होते.

ही कारवाई उपविभागीय वन अधिकारी अमित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली भाताणे वनपरिक्षेत्राच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. अटक केलेल्या आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे येऊर वनपरिक्षेत्रात जानेवारी ते मार्च या कालावधीत दोन बिबट्यांची शिकार झाल्याचे समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT