डहाणू : पालघर जिल्ह्यात येत्या काही दिवसांत हवामानातील बदलाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग, जिल्हा कृषि हवामान केंद्र पालघर आणि कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड यांनी दिलेल्या अंदाजानुसार, १९ आणि २० ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. २१ ऑक्टोबर रोजी, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून, त्यानंतर २२ ऑक्टोबर पासून जिल्ह्यात पूर्णपणे उघडीप राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या या अंदाजानुसार जिल्ह्यातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.