Pudhari News
पालघर

Palghar News | बुलेट ट्रेन प्रकल्पाची पालघरमधील कामे सुसाट

पुढारी वृत्तसेवा

पालघर, नविद शेख: बुलेट ट्रेन प्रकल्पा अंतर्गत भारतातील पहिल्या भूमिगत आणि समुद्र तळाच्या खालून जाणाऱ्या एकूण एकवीस किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या निर्मितीचे काम सुरु झाले आहे. बोगदा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील बुलेट ट्रेन स्टेशन पासून शीळ फाट्या पर्यंत असेल. एकूण २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्या पैकी सोळा किलोमीटर बोगद्याचे खोदकाम टॅनल बोरिंग मशीनच्या साहाय्याने केले जात आहे. उर्वरित पाच किलोमीटर लांबीच्या बोगद्याची निर्मिती न्यू ऑस्ट्रीयन टनलिंग मशीन मार्फत केले जात आहे.

याव्यतिरिक्त बुलेट ट्रेन प्रकल्पा अंतर्गत ठाणे खाडीच्या भागातील समुद्र तळा खालून सात किलोमीटरचा बोगदा खोदला जाणार आहे. मुंबई हाय स्पीड रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी शाफ्ट क्रमांक एक ३६ मिटर खोल सिमेंट पायलिंगचे काम पूर्ण झाले असून अन्य कामासाठी खोदकाम सुरु आहे. विक्रोळी येथील ५६ मिटर खोल असलेल्या शाफ्ट क्रमांक दोनचे सिमेंट पायलिंग पूर्ण झाले आहे. शाफ्ट साठी ९२ टक्के खोदकाम करण्यात आले आहे.

घणसोली जवळच्या सावली येथील ३९ मिटर खोलीच्या शाफ्ट क्रमांक तीनचे खोदकाम पूर्ण झाले आहे. हा शाफ्ट बोगदा खोदणाऱ्या मशीनला उपयोगी ठरणार असून या वर्षाच्या शेवटी बोगदा खोदणारी मशीन उतरवली जाणे अपेक्षित आहे. शीळ फाटा बोगद्याचा एक सुरुवातीचा भाग आहे, पोर्टलचे काम आधीच पूर्ण झाले असून दोनशे मिटर खोल खोदकामही झाले आहे. एडीआईटी (एडिशनली ड्रिवेन इंटरमीडिएट टनल) पोर्टलसाठी ३९४ मिटर लांब एडीआईटी बोगदा सहा महिन्यांच्या रेकॉर्ड वेळेत पूर्ण झाला आहे. त्यामुळे शीळ फाटा येथील अतिरिक्त खोदकामासाठी दोन अतिरिक्त एनएटीएम फेस सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे शीळ फाटा भागात सातशे मिटर लांबीचा बोगद्याच्या निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे. ११ मिटर बाय ६.४ मिटर च्या अंतर्गत जोडणी असलेल्या एडीआईटीची निर्मिती आणि संचालना दरम्यान मुख्य बोगद्या पर्यंत थेट वाहने पोहचणार आहेत, त्यामुळ आपत्कालीन परिस्तिथीत बोगद्या बाहेर पडण्यासाठी अंतर्गत जोडणीचा उपयोग होणार आहे.

टिल्ट सेटलमेंट वायब्रेशन, भेगा आणि वीरूपणाच्या देखरेखीसाठी निर्मिती स्थळासह लगतच्या परिसरात इनक्लिनोमीटर, वायब्रेशन मॉनिटर, ग्राउंड सेटलमेंट मार्कर, टिल्ट मीटर सारखी उपकरणे बसवण्यात आली आहेत. खोदकाम आणि बोगदा निर्मितीसाठी सुरु असलेल्या भूमिगत कामा दरम्यान आजूबाजूच्या संरचनांना होऊ शकणारी जोखीम कमी करण्यासाठी उपकरणे महत्वाची भूमिका बजावतील अशी माहिती नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन कडून देण्यात आली आहे.

गुजरात राज्यात २१० मीटर लांबीच्या पुलाचे काम पूर्ण

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरात राज्यातील नवसारी जिल्ह्यात महामार्गावरून जाणाऱ्या २१० मिटर लांबीच्या पुलाच्या निर्मितीचे पूर्ण करण्यात आले आहे. बुलेट ट्रेनच्या कॉरिडोरच्या वायाडक्ट वर गुजरात राज्यातील नवसारी जिल्ह्यातील सिसोदरा गावात दिल्ली आणि चेन्नई दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावरून जात आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पातील २१० मिटर लांबीचा दुसरा पीएसी बॉक्स सेगमेंट पुल असून पुलाची निर्मिती वैलेंस्ड केंटिलीवर पद्धतीने करण्यात आली आहे. पुलावर ७२ सेगमेंट असून ज्यात ४० ६५ ६५+४० मिटर लांबीचे चार स्पॅन आहेत. पूल बिलीमोरा आणि सुरत बुलेट ट्रेन स्टेशन दरम्यान आहे. सर्वात व्यस्त असलेल्या मुंबई अहमदाबाद महामार्गावर पुलाचे गर्डर लाँचीग करताना काटेकोर नियोजन, सुरक्षितता बाळगल्याची माहिती मिळाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT