आदिवासी ग्रामस्थ मृतदेह प्लास्टिकमध्ये झाकून भर पावसात दहन करताना  (Pudhari Photo)
पालघर

Mokhada News | मृत्यू पश्चातही यातनाच; ताडपत्रीने झाकून करावे लागतात अंत्यसंस्कार

Palghar Mokhada News | ११ गावे मिळून तीनच स्मशानभूमी, ठक्कर बाप्पाचे प्रस्ताव धूळखात

पुढारी वृत्तसेवा
दीपक गायकवाड

Mokhada Kurlaud Gram Panchayat funeral Issue

मोखाडा: मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळपाडा येथील आदिवासी ग्रामस्थांना मृतदेह प्लास्टिकमध्ये झाकून भर पावसात दहन करण्याची वेळ शासनाच्या नाकर्तेपणामुळे आलेली आहे. कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीत 11 गावपाडे आहेत. मात्र, 11 गावपाडे मिळून फक्त तीनच स्मशानभूमी आहेत.

मागील आर्थिक वर्षात शेरेचापाडा, रायपाडा, जांभूळपाडा या तीन ठिकाणी स्मशानभूमीची नितांत आवश्यकता असताना ग्रामपंचायत प्रशासनाने केवळ दोनच गावांचे प्रस्ताव ठक्कर बाप्पा योजनेतून सादर केले आहेत. तथापि तेही आदिवासी प्रकल्पाकडे धूळ खात पडून आहेत. त्यामुळे आदिवासी बांधवांना मृतदेह प्लॅस्टीकचे आच्छादन करुन आणि तेही भरपावसात उघड्यावरच दहन करण्याची दुर्दैवी वेळ आदिवासी बांधवांवर आलेली आहे.

शासन ग्रामपंचायत स्तरावर वेगवेगळा निधी उपलब्ध करून देत असते. त्याचा वापर ग्रामपंचायतीने जिथे गरज आहे, त्या ठिकाणी करायचा असतो. परंतु, तसे न करता आपल्याला जास्त फायदा कुठे आणि कोणत्या कामात किती टक्केवारीत होईल, याचाच सोयीस्कर विचार ग्रामपंचायत प्रशासन आणि गावाचे कर्ते धर्ते करत असतात. त्यामुळे अत्यंत निकडीचे कामे मागे पडत असते. कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील ११ गावांना केवळ ३ स्मशानभूमीचे शेड असणे, हे त्याचेच द्योतक आहे.

सन २०२४ - २५ मध्ये कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील २ गावांसाठी ठक्कर बाप्पा योजनेतून स्मशान भूमी बांधण्यासाठीचे प्रस्ताव आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय जव्हार यांच्या कडे सादर केले होते. परंतु तेव्हा तसे ते मंजूर झालेले नाहीत. त्यामुळे येथील प्रस्ताव प्रलंबित आहेत.
- निखील बोरसे, ग्रामपंचायत अधिकारी, कुर्लोद
याबाबत आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक वेळा वेगवेगळ्या माध्यमातून प्रस्ताव सादर केलेले आहेत.मात्र त्या प्रत्येक ठिकाणी प्रस्ताव रखडलेले आहेत.मात्र चालू आर्थिक वर्षात कोणत्याही परिस्थितीत बहूंताश ठिकाणी स्मशानभूमीचे शेड मंजूर करण्याबाबत ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रयत्न करीन.
मोहन मोडक , लोकनियुक्त सरपंच, ग्रामपंचायत कुर्लोद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT