Palghar Leopard Rescue pudhari photo
पालघर

Palghar Leopard Rescue : नवली-भोगलेपाडा परिसरातील बिबट्या जेरबंद

एका महिलेचा बिबट्याने घेतला होता बळी; नागरिकांचा सुटकेचा नि:श्वास

पुढारी वृत्तसेवा

पालघर शहर : पालघरमध्ये आणखी एका बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. पालघर पूर्वेकडील नवली- भोगलेपाडा परिसरात वनविभागाने लावलेल्या जाळ्यात बिबट्या जेरबंद झाला असून यापूर्वी चिंचणी परिसरातील बिबट्याला पकडण्यात आले होते. दरम्यान बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्यामुळे बिबट्याच्या वावरामुळे भीतीच्या वातावरणात असलेल्या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

पालघर पूर्वेकडील नवली- भोगोलेपाडा परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला होता महिन्याभरापूर्वी या बिबट्याने एका महिलेवर हल्ला करून तिला ठार केले. त्याचप्रमाणे बिबट्याने परिसरात काही पाळीव जनावरांचाही फडशा पडला. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

बिबट्याचा वावर आढळून आल्यानंतर वनविभागामार्फत परिसरात जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने ट्रॅप कॅमेरे आणि पिंजरे बसवण्यात आले होते. वनविभागाने बसवलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या शुक्रवारी सकाळच्या सुमारास जेरबंद झाला.

बिबट्या जेरबंद झालेला पिंजरा जंगलात डोंगराळ भागात असल्याने वनविभागगाचे कर्मचारी, अग्निशमन दल, वाइल्ड लाईफ कंजरवेशन अँड ॲनिमल वेल्फेअर' संस्थेचे पदाधिकारी आणि स्थानिकांच्या मदतीने हा पिंजरा खाली डोंगराळ भागातून आणण्यात आला. रेस्क्यू वाहनातून जेरबंद बिबट्याला पुढील कार्यवाहीसाठी पुढील नेण्यात आले.

दरम्यान बिबट्या पकडण्यात आल्याची माहिती परिसरात पसरल्यानंतर स्थानिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT