पालघर : ड्रग्ज बनविण्यासाठी खोलीत थाटली प्रयोगशाळा  pudhari photo
पालघर

पालघर : ड्रग्ज बनविण्यासाठी खोलीत थाटली प्रयोगशाळा

बोईसर ड्रग्जप्रकरणातील आरोपी एमएस्सी केमिस्ट; चौघे अटकेत

पुढारी वृत्तसेवा

पालघर : बोईसर ड्रम्स प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला असून उच्चशिक्षित असलेल्या आरोपीकडून एका खोलीत मेफेड्रिन तयार करण्याची प्रयोगशाळाच बाटली असल्याची माहिती पुढे आली आहे. तर हे ड्रग्स बनविण्यासाठी हा आरोपी आपल्या कामाव्या अनुभवाच्या आधारे चार दिवसांची ड्रग्स वनविण्याची प्रक्रिया केवळ काही तालात करत होता. तर हे ड्रम्स विकणाऱ्या साखळीतील आणखीन तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

बोईसर काटकरपाडा येथे कलर सिटी इमारतीमध्ये एम. डी नामक ड्रम्स तयार करत असलेल्या खोलीवर छापा टाकून पोलिसांनी आठ फेब्रुवारी रोजी मूळचा मनोर भानेघर येथील रहिवासी अमान नईम मुराद याला तब्बल दोन कोटी चाळीस लाखांच्या मेफेड्रेनसह ताब्यात घेतले. अमान हा उच्वशिक्षित असून एमएससी केमिस्ट आहे. या पदवीनंतर त्याने लुपिन, मॅक्लोड्स, नेप्रोड, ब्लीस फार्मा, रामदेव इलका आदी विविध औषधे तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये चांगल्या पदावर काम केले आहे. या अनुभवाचा गैरफायदा घेत मुंबईहून औषध कंपन्यांच्या नावे तो कच्यामाल बोईसरमध्ये आणून तेथे प्रक्रिया करून प्रयोगशाळेत एमडी पावडर तयार करत होता.

पोलिसांनी त्याचे पितळ उघडे केल्यानंतर केलेल्या चौकशीत एमडी ड्रग्स विकणारी साखळी पोलिसांनी समोर आणली आहे. मिरा रोड येथील कलीम शाकीर खान, अमन आरिफ व सनी राजकुमार सिंग या तिघांनाही या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. हे तिथे एमडी खरेदी व विकणारे आरोपी होते, एमडी नमक ड्रग्स तयार केल्यानंतर त्याने हे ड्रग्स या तिघांना सुरुवातीला टेस्टिंगसाठी दिले होते. त्याला प्रतिसाद मिळाल्यानंतर तो हे एमडी तयार करू त्यांना विक्रीसाठी पुरवत होता. दर महिन्याला ५०० ग्राम ते एक किलो वजनाचे एमडी तयार करून तो विक्री करत असे. गेल्या सहा महिन्यांपासून त्याने हा प्रकार सुरू ठेवला होता. या ड्रग्सची किंमत एका ग्रॅम मागे एक हजार रुपये इतकी आहे. हे कटकारस्थान उचळून लावण्यासाठी पोलिसांना महतायास करावे लागले.

माहिती मिळाल्यानंतर ते मुद्देमालासह आरोपी पकडेपर्यंत पोलिसांना कसरत करावी लागली. पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अपर पोलीस अधीक्षक विनायक नरले, उपविभागीय अधिकारी विकास नाईक, संगीता शिंदे अल्फान्सो, बोईसर पोलीस ठाण्याचे अधिकारी शिरीष पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी प्रदीप पाटील, सपोनी सतीश अरुवर, अनिल व्हटकर, पोऊनी गणपत सुळे, राजेश वाघ, सुनील नलावडे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

या ड्रग्स प्रकरणात आरोपी अमान याने स्थानिक स्तरावरील काहीशी हातमिळवणी केल्याची शक्यता असून त्याच्याशी संबंधित सर्व प्रकरणांचे धागे दोरे पकडून तपास सुरू असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

शक्कल लढवून पोलिसांनी टाकला छापा; मुद्देमालही केला जप्त

बोईसर काटकरपाडा येथील कलरसिटी संकुलात इमारत क्रमांक १७ मधील खोली क्रमांक १०३ मध्ये एमडी तयार करण्याची प्रयोगशाळा अमान मुराद याने सुरू केली होती. पोलिसांना सूत्रांच्या हवाले ही माहिती मिळाली. पोलिसांनी पाळत ठेवून तथ्य तपासले व पोलिसांना खरी माहिती मिळाली. पोलिसांनी अमानवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. चाड टाकताच एमडी इप्स पावडर बाथरूममध्ये टाकून पुरावा नष्ट करण्याची भीती पोलिसांना होती. त्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेत धाड टाकण्याच्या दिवशी म्हणजे आठ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी पहिले अमानच्या घरचा वीजपुरवठा वायरमनकरवी खंडित केला. त्यानंतर या वायरमनला अमानच्या खोलीकडे पाठवले. वीजपुरवठा सुरू करायचे असल्याने वायरमनने अमानकडून वीज बिल मागवले, याच वेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकून अमान व मुद्देमाल हस्तगत केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT