विक्रमगड देहेजें प्रकल्पबाधिताच्या समस्या ऐकून घेताना खासदार डॉ. हेमंत सावरा, हरिश्चंद्र भोये, देहेजें प्रकल्प कार्यकारी अभियंता, दिनेश शेवाळे, शेतकरी वर्ग उपस्थित होते.  (Pudhari Photo)
पालघर

Palghar News | देहेर्जेच्या समस्या मार्गी लावा, नंतरच पाणी अडवा

Project-affected Families | प्रकल्पग्रस्त कुटुंबांनी मांडल्या समस्या, आमदार खासदारांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

पुढारी वृत्तसेवा

Water Blockage Protest Palghar

जव्हार : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात देहेर्जे प्रकल्पाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून, प्रकल्पग्रस्त आदिवासी कुटुंबांना भूसंपदन, किंवा घरांचा शेतीचा मोबदला विषयी हे प्रकल्प अधिकारी काहीही बोलायला तयार नाही. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या समस्या अडचणी खासदार आमदारांसोबत समस्या मांडल्या. शनिवारी सबंधित अधिकारी समवेत आमदार, खासदारांसमोर शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या. अखेर अधिकाऱ्यांना कुटुंबांना समोरच समस्यांची उत्तरे द्यावी लागली.

विक्रमगड तालुक्यात साखरा गावाजवळ देहेर्जे प्रकल्पाचे काम अंतिम टप्यात आले आहे, मात्र २०१९ पासून बाधित शेतकऱ्यांना अजूनही काही मोबदला मिळाला नाही, तसेच मोबदला लवकर मिळावा, नाहीतर कामे उरकून निघून जातील, आम्ही गरीब आदिवासी शेतकऱ्यांनी जायचं कोणाकडे, अशी खंत त्या बाधित कुटुंबांनी आमदार, खासदारांच्या उपस्थित समस्या उपस्थित केल्या. तसेच ह्या बाधित प्रकल्प कुटुंबांचे पुनर्वसनचे काय, या प्रकल्पात ज्या गावांना पाणी टंचाईग्रस्त लोकांना अगोदर पाणी द्या, नंतर वसई विरार नगरपालिकेला किंवा कुठे न्यायचे तिथे न्या, असे आदिवासी शेतकरी कुटुंबांनी सांगितले. येथे शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. आमचा शेतकऱ्यांचा विचार करा, नंतरच ह्या देहेर्जे प्रकल्पाचे काय करायचे ते करा. तसेच आजपर्यंत शेतकऱ्यांचे भूसंपादन विभाग याकडे लक्ष घालत नाही. तसेच बाधित शेतकऱ्यांना नोटीसा नाही. प्रकल्प जवळपास पूर्ण व्हायला आला, तरीही अनेक समस्या आहेत.

देहेर्जे प्रकल्पात विक्रमगड, जव्हार तालुक्यातील खुडेद, साखरा, भडांगेपाडा, उंबरवागणं, तिवसपाडा, संगमनेर, महालेपाडा, अशा अनेक गाव-पाड्यांची एकूण १७९ कुटुंबे प्रकल्पबाधित कुटुंबे आहेत. पुनर्वसन अगोदर लवकर करा, त्यांना घर आणि शेती मोबदला द्या, नंतरच पाणी अडवा अशी शेतकऱ्यांनी खंत मांडली. त्यावेळी बुडीत क्षेत्र बाधित शेतकऱ्यांना दुर्लक्ष करू नका, असे यापूर्वी झालेल्या अनेक प्रकल्पाचे उदाहरण देत, आमदार, खासदारांनी त्या देहेर्जे प्रकल्प अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत.तसेच या अगोदर जव्हार, मोखाडा ह्या भागात अनेक प्रकल्प झाले. त्यांच्या धरणाचे काम झाल्यानंतर अजूनही अपूर्ण आहेत. याप्रमाणे देहेर्जे प्रकल्पातील बाधित कुटुंबाचे हाल व्हायला नको, असा सूचना आमदार हरिश्चंद्र भोये, खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी सबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

देहर्जे प्रकल्पग्रस्त भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना अगोदर सोयीसुविधा उपलब्ध करून द्या, बाधित शेतकऱ्यांकडे लक्ष द्या, अनेक समस्या यापुढे उद्भवणार आहेत. तसेच प्लॉटधारक कुटुंबाचे काय, खाजगी जमिनी प्रमाणे वन प्लॉट धारकांना, ज्यांच्या नावे मजूर वनपट्टे आहेत, त्या कुटुंबांना मजुरी द्या, सबंधित अधिकाऱ्यांना कडक सूचना त्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यावेळी कोकण विभाग बंधारे प्रकल्पग्रस्त बाधित कुटुंबाचा अहवाल गेल्याचे त्या उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, २०१९ पासून बाधित शेतकऱ्यांना अजूनही काही मोबदला मिळाला नाही, तसेच मोबदला लवकर मिळावा, नाहीतर कामे उरकून निघून जातील आणि त्यानंतर आम्ही गरीब आदिवासी शेतकऱ्यांनी जायचं कोणाकडे, अशी खंत आहे.

विक्रमगड देहेजें प्रकल्पबाधिताच्या समस्या ऐकून घेताना खासदार डॉ. हेमंत सावरा, हरिश्चंद्र भोये, देहेजें प्रकल्प कार्यकारी अभियंता, दिनेश शेवाळे, शेतकरी वर्ग उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT